‘हनी ट्रॅप’ पासून राहा सावध

सर्वसामान्य लोकांसाठी ‘हनी ट्रॅप’ हा शब्द नवीन वाटत असला, तरी शब्दाने अनेकाचे आयुष्य उद्‌धवस्त केले आहे. एकीकडे २१ ध्या शतकाच्या उंबरठ्यावर प्रगत तंत्रज्ञानाच्या गप्पा केल्या जात असून जाता पाच तंत्रज्ञानाचा काही जणांकडून दुरुपयोग केला जाऊ लागला आहे. छुपे कॅमेरे किंवा मोबाईलमध्ये असलेल्या कॅमे-याच्या साहाय्याने अश्लील व्हिडीओ तयार करून नंतर पाच व्हिडीओच्या माध्यमातून संबंधितांना ब्लॅकमेल केले जाते आणि खंडणी वसूल केली जाते. हनी ट्रॅप असाव एक प्रकार सध्या राज्यात गाजत आहे. परवा गडचिरोली पोलिसांनी हनी टॅपमध्ये अडकलेल्या एका सहायक अभियंत्याची सुटका केली आहे. या अभियंत्याच्या तक्रारीवरून पोलिसांनी पत्रकार, पोलिसासह एकूण पाच लोकांना जेरबंद केले आहे.

या हनी ट्रॅप प्रकरणात खुद्द अभियंत्याच्या मिशनेच आपल्या इतर मित्रांच्या साहाय्याने अडकवले आणि १० लाख रुपये खंडणीची मागणी केली. या प्रकरणाला कंटाळलेल्या अभियंत्याने पोलिस अधीक्षक नीलोत्पल पांच्याकडे तक्रार दाखल करून आपण हनी टॅपमध्ये अडकलो असल्याचे सांगितले, पोलिस अधीक्षकांनी तातडीने दखल घेतल्याने अभियंता खंडणी देण्यापासून बचावता. मात्र, आजवर पा टोळीने अनेकांना लाखोने गंडवले असून कितीतरी पुरुषांचे आयुष्य उद्ध्वस्त केले आहे.

या प्रकरणात कॉल गर्लला हाताशी धरून कधित पत्रकार रविकांत कांबळे, पोलिस अंमलदार सुशील गवई पा दोघांनी अनेक पुरुषांना हनी ट्रॅपमध्ये अडकवून गडवले असत्याचे आता सांगितले जात आहे. या टोळीचा पर्दाफाश करून गडचिरोली पोलिसांनी हनी ट्रॅपमध्ये अडकण्यापासून अनेकांना वाचवले असले, तरी असे प्रकार राज्यात रोजच कुठे ना कुठे घडू लागले आहेत. कमी वेळात पैसे कमाविण्याच्या नादात गैरमार्गाचा वापर करणान्यांची संख्या आता समाजात वाटू लागली असून त्यांचा त्रास इतरांनाही होऊ लागला आहे. हनी ट्रॅप प्रकरणात अनेकदा मोबाईल, छुपे कॅमेरे याचा वापर केला जात असून बदनामीच्या भीतीने अनेक जण या टोळीच्या जाळ्यात अडकतात आणि खंडणी देण्यास तयार होतात.

बदनामीच्या भीतीपोटी किंवा आपले व्हिडीमो व्हायरल होऊ नये म्हणून अनेक जण पोलिसांकडे जात नाही आणि त्यामुळेव अशा टोळ्यांची हिंमत दिवसान्गणीक वाढत असते, समाजातील काही माणसाची प्रवृत्ती तोभी झाल्याने ते सर्रास गैरप्रकार करापला तयार होतात आणि मग हनी ट्रॅपसारख्या प्रकारात अडकतात. त्यामुळे आता कुठल्याही प्रकारचे गैरवर्तन करताना सर्वसामान्यांनी काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे. कुठल्याही परक्या ठिकाणी, परक्या महिलेसोबत एकत्र थांबताना लोकांनी विचार करण्याची गरज आहे. आपला वापर केला जाऊ नये म्हणून सावधगिरी बाळगायला पाहिजे. कुणावरही विश्वास ठेवताना विचार करायला पाहिजे, जवळच्या जुन्या मित्रानेव या अभियंत्याला हनी ट्रॅपमध्ये अडकवून खंडणी वसूल करण्पाचा प्रपत्न केला आहे. लोकाना फसविण्यासाठी समाजात अशी टोळी कार्यरत असली तरी केवळ पासाठी त्यांनाच दोषी ठरवून बालत नाही, जे गैरकृत्य आहे.

हे माहीत असूनही आपण ते करण्यासाठी धजावतो आणि मग अशा प्रकरणांमध्ये स्वतःला अडकवून घेतो, फसवणुकीच्या प्रकरणात बऱ्याचदा फसवणूक झालेल्याचा निष्काळजीपणा कारणीभूत ठरतो. जितके तांत्रिकदृष्ट्या आपण प्रगत होत आहोत, तंत्रज्ञानाचा वापर करू लागलो आहोत, त्याच तंत्रज्ञानाचा दुरुपयोगही आता समाजातील काही वर्गाकडून केला जात आहे. व्हॉटसअॅप व्हिडीओ कॉलिंगच्या माध्यमातून अनेकदा अश्लीत फोटो सेव्ह करून पुरुषांना गंडवले जात असल्याच्याही अनेक तक्रारी पुढे आल्या आहेत. ओळख नसतानाही अनोळखी लोकांशी व्हॉटसअॅपवर चटिंग करणे, त्यांना आपले अश्लील फोटो पाठविणे, महिलांशी सलगी करण्याच्या नावाखाली त्यांनी पाठविलेल्या लिंकवर जागे या सान्या प्रकारातूनच हनी ट्रॅपसारखे प्रकार घडू लागले आहेत.

पाला आळा घालण्याची जबाबदारी केवळ पोलिस किंवा सरकारची नसून समाजातील नागरिकांचीही आहे त्यांनी कुठलेही गैरकृत्य करताना सदसदविवेकबुद्धी वापरण्याची गरज आहे. म्हणूनच म्हटले जाते, गुन्हेगारी सरकार नाही तर संस्कारव थांबवू शकते, हनी ट्रॅप किंवा फसवणुकीसारख्या प्रकारात अडकू नये यासाठी आता प्रत्येकाने सावधगिरी बाळगण्याची गरज आहे. आपली फसवणूक होते आहे. आपल्याला ब्लॅकमेलिंग करून खंडणी वसूल केली जात आहे, हे लक्षात घेऊनही अनेकजण तक्रार करण्यासाठी पोलिसांकडे जात नाही आणि अनेकदा तर तक्रार होऊनही पोलिस त्याकडे दुर्लक्ष करतात. मात्र, या प्रकरणात सहायक अभियंत्याने गडचिरोली पोलिसांकडे तक्रार केल्यानंतर पोलिस अधीक्षक नीलोत्पल यांनी तातडीने कारवाई केली. हनी ट्रॅप टोळीचा पर्दाफाश केला आहे. त्यामुळे नीलोत्पल अभिनंदनास पात्र आहेत.

९९२२९९९५८८