हरियाणा आणि जम्मू-काश्मीरात ‘व्होट जिहाद’, महाराष्ट्रात सजग राहण्याची आवश्यकता

या वर्षीच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या काही दिवस आधी (२९ एप्रिल रोजी) समाजवादी पक्षाच्या नेत्या मारिया आलम यांनी  उत्तर प्रदेशातील फारुखाबाद येथे एका मेळाव्याला संबोधित करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या विरोधात भारतातील मुस्लिम मतदारांना “व्होट जिहाद” पुकारण्याचे आवाहन केले.

मारिया आलम ही काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय कायदा मंत्री सलमान खुर्शीद यांची भाची आहे.

त्याचा परिणाम सार्वत्रिक निवडणुकांमध्ये लगेच दिसून आला.  प्रामुख्याने मुस्लिम मतांचे एकत्रीकरण आणि ध्रुवीकरण यामुळे भाजपने उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रासह देशातील इतर भागांमध्ये अनेक जागा गमावल्या.
पंतप्रधान मोदींसह भाजप नेतृत्वाने मुस्लिम समुदायाला त्यांच्या येणाऱ्या पिढ्यांचे भविष्य लक्षात घेऊन मतदान करण्याचे आवाहन केले असले तरी, समुदायाने इंडी आघाडीला ‘एन ब्लॉक’ (एक गठ्ठा मतदानाने) पाठिंबा दिला.

चार महिन्यानंतर हे चित्र बदलले नाही. नुकत्याच पार पडलेल्या हरियाणा आणि जम्मू-काश्मीरच्या विधानसभा निवडणुकांमध्ये मुस्लिम मतांचे असेच एकत्रीकरण आपण पाहतो. आणि येणाऱ्या महाराष्ट्राच्या विधानसभेच्या निवडणुकीत  त्याची पुनरावृत्ती होण्याची दाट शक्यता आहे.

मुस्लिमांचे संघटित मतदान

एप्रिल-मे २०२४ मध्याला निवडणुकीत केंद्रातील सत्तेत भाजप पुन्हा येऊ नये, यासाठी देशातील मुस्लिमांनी आणि त्यांच्या नेत्यांनी सर्वशक्तीनिशी प्रयत्न केल्याचे उघड झाले आहे. अगदी महाराष्ट्राचा विचार करायचा तर महाविकास आघाडीला मुस्लिमांनी दिलेली साथ आणि त्यामुळे आघाडीला मिळालेले घवघवीत यश हे मुद्दे सहजच लक्षात येतील. केंद्रातील सत्तेत येण्यापासून मुस्लिम भाजपला रोखू शकले नाहीत. मात्र त्यांच्या मतांची किंमत त्यांनी संघटितपणे दाखवून दिली आहे. इतकेच नाही, तर आमच्यामुळे तुम्ही जिंकून आलात हे छातीठोकपणाने सांगण्याच्या पातळीपर्यंत ते आले आहेत. मुस्लिमांची एकगठ्ठा मते काय करू शकतात हे समजल्यामुळे महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीतही मुस्लिम मतांसाठी फार मोठे लांगूलचालन होणार हे उघड आहे.
महाराष्ट्रामधील काही उदाहरणे भाजपचा पराभव अत्यंत योजनाबद्ध पद्धतीने करण्यात आला. सर्वात प्रामुख्याने विचार करायचा झाला तर धुळे  लोकसभा मतदार संघ. या मतदारसंघात काँग्रेसच्या डॉ. शोभा बच्छाव ५ हजार ११७ मतांनी विजयी झाल्या खऱ्या, पण त्यांना मताधिक्य मिळाले सहापैकी केवळ एका विधानसभा मतदारसंघात. सटाणा, धुळे शहर, मालेगाव बाह्य, धुळे ग्रामीण, शिंदखेडा या पाच मतदारसंघांमध्ये मिळून भाजपचे डॉ. सुभाष भामरे यांना १ लाख ८९ हजार २१० मतांची आघाडी मिळाली. मालेगाव मध्य या मतदारसंघात डॉ. भामरे यांना केवळ ४ हजार ५४२ मते मिळाली आणि तिथेच डॉ. बच्छाव यांना १ लाख ९४ हजार ३२७ मतांची आघाडी मिळाली. या आघाडीमुळे त्या विजयी झाल्या. एकट्या मालेगाव मतदारसंघातील आघाडीने डॉ. बच्छाव यांना विजयी केले.

इतर काही ठिकाणे

मुंबईत भेंडी बाजार, मोहम्मद अली रोड, चोर बाजार येथील १२ बूथमध्ये शिवसेनेच्या यामिनी जाधव यांना केवळ ४४ मते मिळाली, तर त्यांच्या विरोधातील उबाठा सेनेचे अरविंद सावंत यांना ५ हजार ८६६ मते मिळाली. या मतदारसंघातील १९१ क्रमांकाच्या बूथमध्ये जाधव यांना एक तर सावंत यांना ३११ मते मिळाली आहेत.

मुंबईतील भांडुप विधानसभा मतदारसंघातील पठाण कॉलनी, दर्गा रोड, रहिमनगर, जमीलनगर, सोनापूर या भागातील १३ बूथमध्ये भाजपच्या मिहीर कोटेचा यांना ८२० तर उबाठा सेनेच्या संजय पाटील यांना ४ हजार ३७० मते मिळाली आहेत.

अमरावतीमध्ये जमील कॉलनी येथील ३६ बूथमधील मतदानाची आकडेवारी देखील अशीच आहे. तेथे भाजपच्या नवनीत राणा यांना ३६ बूथमध्ये मिळून १२६ तर काँग्रेसचे बळवंत वानखेडे यांना २५ हजार ७४८ मते मिळाली आहेत.

भाजपा कडून मुसलमानांना तिकीट पण तोच परिणाम

मुस्लिमांना तिकीट न दिल्याबद्दल भाजपवर अनेकदा टीका केली जाते पण यावेळी भाजपने मुस्लिमांना विक्रमी २७ तिकिटे दिली. हरियाणा मध्ये २ तर  जम्मू-काश्मीरमधे २५ मुस्लिम उमेदवार भाजप तर्फे निवडणूक रिंगणात होते. भाजपच्या या २७ मुस्लिम उमेदवारांचे काय झाले? त्यांना मुस्लिमांचा पाठिंबा मिळाला का? साहजिकच त्यांना पराभव पत्करावा लागला. बहुतांश जागांवर भाजपच्या मुस्लिम उमेदवारांना अनामत रक्कम गमवावी लागली आणि ते तळाशी राहिले.

दुसरीकडे मुस्लिमांनी हरियाणा आणि जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस आणि त्यांच्या मित्रपक्षांना एकतर्फी मतदान केले

जम्मू-काश्मीरमध्ये काँग्रेस-नॅशनल कॉन्फरेन्स आघाडीने ४८ जागा जिंकल्या त्यापैकी ४६ मुस्लिम आहेत.

भाजपाला जम्मू मधे २९ जागा जिंकता आल्या, ज्यात २८ हिंदू आणि एक शीख आहे. पण काश्मीर खोऱ्यात ४७ जागांपैकी एकही जागा भाजपाला नाही मिळाली.

महाराष्ट्रात मुस्लिमांकडून मागणी

राजकीय वर्तुळात विधानसभेचे वारे वाहत असून सर्वच पक्षांनी महाराष्ट्रात मोर्चेबांधणीला सुरुवात केली आहे. एमआयएमने (MIM) एकीकडे महाविकास आघाडीत सामील होण्याची इच्छा व्यक्त करत मुस्लीमबहुल २८ जागांवर निवडणूक लढविण्याची तयारी दर्शविली आहे. तशा प्रकारे यादी पण सुपूर्द करण्यात आली आहे असे कळते. पुणे विभागात २, अमरावती विभागात ५, मराठवाडा ४, नाशिक २, मुंबई १२, ठाणे आणि कोंकण विभाग ३ अशा एकूण २८ जागा “एमआयएम बाजी मारू शकतं” असा दावा करत प्रदेशाध्यक्ष इम्तियाज जलील यांनी प्रस्तावात महाविकास आघाडीला म्हटले आहे.

काही आकडेवारी

पुहाना विधानसभा  (हरियाणा)
एकूण मते: १४५,०००
मोहम्मद इलियास (काँग्रेस): ८५,३००
राशिद खान (अपक्ष): ५३,३८४
मोहम्मद आयजा खान (भाजप): ५,०७२
भाजपच्या उमेदवाराचे डिपॉझिट गमवावे लागले. असे दिसते की ५,०७२ हिंदू वगळता एकाही मुस्लिमाने भाजपला मतदान केले नाही.

फिरोजपूर झिरका (हरियाणा)

एकूण मते: १८०,०००
मम्मन खान (काँग्रेस): १३०,४९७
नासेद अहमद (भाजप): ३२,०५६
भाजपच्या उमेदवाराने आपली अनामत रक्कम काही फरकाने वाचवली.  त्यांना जवळपास १६% मते मिळाली जी बहुधा सर्व हिंदू होती.
मम्मन खान, ज्याला नूह जिल्ह्यातील २०२२-२३ मधील जातीय हिंसाचाराचा सूत्रधार म्हणून संबोधले जाते आणि ज्याच्यावर बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) अधिनियम (UAPA) अंतर्गत गुन्हे दाखल झालेले आहेत, त्याला ७५% मते मिळाली.

नूह विधानसभा (हरियाणा)

एकूण मते: १५४,६६७
आफताब अहमद ( काँग्रेस) ९१,८३३
ताहिर हुसेन (लोक दल) ४४,८७०
संजय सिंह (भाजपा) १५,९०२

राजेश कोरडे