मुंबई : भारतीय हवामान खात्याकडून पावसाबद्दलची महत्त्वाची अपडेट पुढे आली आहे. राज्यात सततच्या पावसाचा जोर ओसरला असून कोणत्याही जिल्ह्याला पुढील २४ तासांकरिता रेड, ऑरेंज किंवा येलो यापैकी कोणताच अलर्ट देण्यात आलेला नाही.
हवामान खात्याकडून राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये ६५ मि. मी. पर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. तसेच त्याठिकाणी ग्रीन अलर्ट देण्यात आल्याची माहिती मंत्रालय नियंत्रण कक्षाकडून देण्यात आली आहे.
किनारपट्टीलगतच्या जिल्ह्यांसाठी पुढील २४ तासांकरिता सकाळी ४:५२ वाजता व दुपारी ४:३९ वाजता भरतीच्या वेळा देण्यात आल्या आहे. तसेच सकाळी ३.७ मीटर आणि दुपारी ३. ८ मीटर पर्यंत समुद्राच्या लाटा येण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.
राज्यातील महत्वाच्या धरणांचा पाणीसाठा (दलघमी) आणि धरणांमधून सोडण्यात आलेला विसर्ग (क्यूमेक्स) पुढीलप्रमाणे –
हतनूर (जळगाव) (एकूण क्षमता २५५ दलघमी) आतापर्यंत ४६४ क्यूमेक्स विसर्ग.
गोसेखुर्द (भंडारा) (एकूण क्षमता ७४०.१७ दलघमी) आतापर्यंत २०५३.९८ क्यूमेक्स विसर्ग.
भंडारदरा (अहमदनगर) (एकूण क्षमता ३०४.१० दलघमी) आतापर्यंत ५४.९३ क्यूमेक्स विसर्ग.
दारणा (नाशिक) (एकूण क्षमता २०२.४४ दलघमी) आतापर्यंत ३५.४० क्यूमेक्स विसर्ग.
दूधगंगा (कोल्हापूर) (एकूण क्षमता ६७९.११ दलघमी) आतापर्यंत ६८ क्यूमेक्स विसर्ग.
राधानगरी (कोल्हापूर) (एकूण क्षमता २१९.९७ दलघमी) आतापर्यंत ८० क्यूमेक्स विसर्ग.