हाडाखेड तपासणी नाक्यावर 8 लाखांचा अवैध मद्यसाठा जप्त; शिरपूर तालुका पोलिसांची कामगिरी

शिरपूर ः चंदीगड निर्मित दारू कर बुडवून राज्यात विक्रीसाठी आयशर वाहनातून येत असल्याची माहिती शिरपूर तालुका पोलिसांना मिळाल्यानंतर गुरुवार, 7 रोजी हाडाखेड चेक पोस्टवर नाकाबंदी लावून आयशर जप्त करण्यात आला. पोलिसांनी आठ लाख रुपये किमतीचा अवैध मद्यसाठा जप्त केला तर चालक मात्र पसार होण्यात यशस्वी झाला.

गोपनीय माहितीवरून कारवाई
शिरपूर तालुक्याचे सहाय्यक निरीक्षक सुरेश शिरसाठ यांना सेंधव्याकडून शिरपूरकडे एक आयशर कंटेनरमध्ये अवैध दारू वाहून नेली जात असल्याची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी पथकाला कारवाईचे आदेश दिले. आयशर वाहन (क्र. एन.एल.01 ए.सी.2876) ही हाडाखेड चेकपोस्टजवळ येताच चालक पसर झाला तर तर वाहनातील मोबाईल जप्त केल्यानंतर त्याद्वारे मूळ मालकांशी संपर्क झाला झडतीसाठी परवानगी मिळाल्यानंतर पुढील कारवाई करण्यात आली. चंदीगढ केंद्रशासीत प्रदेशात विक्री करण्याची मुभा असलेली विदेशी दारू महाराष्ट्रात कर चुकवून आणली जात असताना पोलिसांनी कारवाई करीत मॅकडॉल, रॉयल चॅलेंज, राय स्टॅग मिळून एकूण आठ लाखांचे दारू तसेच 15 लाखांचा आयशर असा एकूण 23 लाख 400 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

यांनी केली कारवाई
ही कारवाई धुळे पोलीस अधीक्षक श्रीकांत धीवरे, अपर पोलीस अधीक्षक किशोर काळे, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन हिरे यांच्या मार्गदर्शनाखाली शिरपूर तालुक्याचे सहासय्य निरीक्षक सुरेश शिरसाठ, सुनील वसावे, मंगला पवार, संदीप ठाकरे, कृष्णा पावरा, चालक हवालदार संतोष पाटील, ईसरार फारुकी आदींच्या पथकाने ही कारवाई केली. याप्रकरणी नाईक संदीप नाईक यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला.