हा कसला पोरकटपणा आहे? उपमुख्यमंत्री अजितदादा यांचा उद्धव ठाकरेंना सवाल ?

मुंबई: राज्यातील कायदा व सुव्यवस्थेची स्थिती ढासळली असून महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्याची मागणी आज अचानक विरोधी पक्षांकडून होऊ लागली आहे. उद्धव ठाकरे सरकार बरखास्त करण्याची मागणी करत आहेत. याबद्दल बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले की, थोडं काही घडलं की, सरकार बरखास्त करा म्हणतात. हा काही पोरखेळ आहे का? त्याला काही नियम कायदे आहेत की, नाही? त्यांना थोडं तरी कळतं का? “याला काय अर्थ आहे? मागच्या काळात अशा घटना घडल्या नाहीत का? मी त्या घटनांचं समर्थन करत नाही पण थोडं काही घडलं की, सरकार बरखास्त करा म्हणतात. हा काही पोरखेळ आहे का? त्याला काही नियम कायदे, कानून आहेत की, नाही? उगीच उठायचं आणि प्रसिद्धी मिळवण्यासाठी सरकार बरखास्त करा म्हणायचं. हा कसला पोरकटपणा आहे?” असे ते म्हणाले.

बाबा सिद्दीकी यांनी काँग्रेसच्या सदस्यत्वाचा राजीनामा दिल्यानंतर शनिवारी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये पक्षप्रवेश केला. या कार्यक्रमानंतर उपमुख्यमंत्री अजित पवारांनी माध्यमांशी संवाद साधला. ते म्हणाले की, “बाबा सिद्दीकी यांनी माझ्यासोबत तीन टर्म आमदार म्हणून वांद्रा येथील प्रतिनिधीत्व केलं आहे. त्यांनी चार वर्ष राज्य मंत्रिमंडळ आणि दोन टर्म महानगरपालिकेत काम केलं आहे. बाबा सिद्दीकी हे एक हरहुन्नरी व्यक्तिमत्त्व आहे. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी त्यांच्या विचाराचे कार्यकर्ते आहेत. आम्हाला निश्चितपणे त्यांचा फायदा मुंबईसह महाराष्ट्रातही होईल,” असेही ते म्हणाले.