---Advertisement---

“हिट अँड रन”, पाचोऱ्यात वाहन चालक रस्त्यावर

---Advertisement---

जळगाव : केंद्र सरकारच्या नव्या वाहन कायद्याच्या विरोधात देशभरातील वाहनचालकांनी चार दिवसांसाठी संप पुकारलेला आहे. जळगाव जिल्ह्यातील पाचोरा येथे देखील जय संघर्ष वाहन चालक चालक-मालक संघटनेतर्फे भव्य रॅली काढून शासनाच्या निषेध करण्यात आला. याबाबत तहसीलदार संभाजी पाटील यांना निवेदन देण्यात आले.

यावेळी महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष प्रवीण वाघ, खान्देश सहकार्य अध्यक्ष योगेश पवार, पाचोरा तालुका अध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे, बस विभागाचे अध्यक्ष उत्तम बोरसे, पाचोरा शहराध्यक्ष दिपक पवार व स्थानिक ऐकता रिक्षा युनियनचे अध्यक्ष एकनाथ सदाशिव, नाना चौधरी, अशोक निंबाळकर, अवजड विभाग व सर्व संघटनांनी व वाहन-चालक मालक उपस्थित होते.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment