हिमाचल : सर्वच पक्ष आपआपले पक्ष उमेदवार जाहीर करता आहेत. आताच हिमाचल मधून एक बातमी समोर आली आहे, काँग्रेस पक्षाचे ६ आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे, हिमाचल प्रदेशमधील राज्यसभेच्या निवडणूकीत भाजप नेत्यांना क्रॉस मतदान करणाऱ्या काँग्रेसच्या सहा आमदारांनी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याव्यतिरिक्त तीन अपक्ष आमदारांनी ही भाजपमध्ये प्रवेश केला. हा पक्षप्रवेश २३ मार्च शनिवार रोजी दिल्लीत झाला.
यावेळी केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी त्यांचा पक्षात प्रवेश घडवला. या आमदारांमध्ये सुजानपूरमधून राजेंद्र राणा, धर्मशालामधून सुधीर शर्मा, लाहौल स्पीतीमधून रवी ठाकूर, बडसरमधून इंद्रदत्त लखनपाल, कुतलाहारमधून देवेंद्र कुमार भुट्टो आणि गाग्रेटमधून चैतन्य शर्मा आणि अपक्षांमध्ये देहरामधून होशियार सिंग, नालागढमधून केएल ठाकूर आणि हमीरपूरमधून केएल ठाकूर यांचा समावेश आहे. आशिष शर्मा यांचा समावेश आहे.