हिवाळ्यात फोन फ्रीझ होतोय? करा हे उपाय

तरुण भारत लाईव्ह । ६ जानेवारी २०२३। सद्या थंडीचे प्रमाण खूप वाढले आहे. थंडीचा जसा आपल्या शरीरावर परिणाम होत असतो तसाच तो आपल्या स्मार्टफोन वर सुद्धा त्याचा परिणाम हा होत असतो. म्हणजे जास्त थंडी पडल्यावर थंडीचा परिणाम आपल्या स्मार्टफोन लिफेवर होत असतो. जास्त काळ अति तापलेल्या किंवा थंड तापमानात राहिल्याने स्मार्टफोनची लाईफ कमी होते हे देखील तितकेच खरे आहे. थंडीमध्ये अनेकदा स्मार्टफोन हँग होऊन जातो किंवा काहीवेळा खूप स्मार्टफोन खूप हळू काम करतो. यासारख्या समस्यांपासून तुमचा स्मार्टफोन ची तुम्ही कशी काळजी घेऊ शकता हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

जर अतिशय थंड तापमान असेल तेव्हा स्मार्टफोन च्या बॅटरी ची लाईफ कमी होऊन जाते. स्मार्टफोन नेहमी जसा वेगाने काम करतो तर जास्त थंडीमध्ये स्मार्टफोन अतिशय हळू पद्धतीने करायला लागतो, आपल्याला वाटते कि मोबाइल मध्ये काही प्रॉब्लेम असेल म्हणून आपण फोने बंद करून चालू करतो आपल्याला वाटत कि फोन बंद करून पुन्हा चालू केल्यावर तो वेगाने काम करण्यास सुरवात करेल पण तसे होत नाही. थंडी मध्ये तुम्हाला जर तुमचा फोन चांगल्या कंडिशन मध्ये पाहिजे असेल तर तुम्हाला काही गोष्टी फोल्लो करणं गरजेचं राहील.

तुम्ही तुमचा फोन योग्य पद्धतीने कव्हर करायला हवा. रात्री झोपताना फोन बंद करून ठेवायला हवा ज्यामुळे तुमची मोबाइल लाईफ कमी होणार नाही. स्मार्टफोन ला योग्य पद्धतीने कव्हर केल्याने त्याचे तापमात योग्य रहाण्यास मदत होईल. तसेच थंडीच्या दिवसात बाहेर जाताना तुम्ही तुमचा फोन तुमच्या खिशात ठेवा त्यामुळे स्मार्टफोन ला उष्णता मिळेल. या टिप्स तुम्ही थंडीच्या दिवसात फोल्लो केलात तर तुमचा स्मार्टफोन सुरक्षित राहील.