हेल्थ टिप्स : जर तुम्हीही हिवाळ्यात जास्त मद्यपान करत असाल तर तुम्ही सावध राहण्याची गरज आहे कारण या ऋतूत जास्त मद्यपान केल्याने हार्ट अटॅकचा धोका वाढू शकतो हिवाळ्यात मद्यपान केल्याने शरीरातील तापमान अधिक खाली जाते, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे. जेव्हा तापमान कमी होते तेव्हा शरीरातील रक्तवाहिन्या आकुंचन पावतात आणि बीपी जास्त होऊ लागते. त्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो. इतकंच नाही तर हिवाळ्यात जास्त मद्यपान केल्याने रक्ताच्या गुठळ्या तयार होतात आणि प्लेग फुटण्याचा धोका वाढतो. प्लेग फुटणे आणि रक्ताच्या गुठळ्या हृदयविकाराच्या झटक्याची कारणे मानली जातात.
हिवाळ्यात मद्यपान केल्याने काही काळ शरीर उबदार होते, पण काही काळानंतर शरीर खूप थंड होते, ज्यामुळे हार्ट अटॅकचा धोका वाढतो, असे आरोग्य तज्ज्ञांचे म्हणणे आहे.त्यामुळे हिवाळ्यात जास्त मद्यपान करणे टाळावे. विशेषत: ज्या लोकांचा रक्तदाब जास्त आहे आणि जे हृदयरुग्ण आहेत, त्यांनी या ऋतूत अल्कोहोलपासून दूर राहावे.