‘ही’महिला ठरली भारताची पहिली महिला कसोटी पंच

नवी मुंबई: १४ डिसेंबर येथील डी. वाय. पाटील स्टेडियमवर गुरुवारी भारत व इंग्लंड  यांच्यातील एकमेव कसोटी सामन्याच्या पहिल्या दिवशी वृंदा राठी यांनी भारतीय महिला क्रिकेटच्या इतिहासाच्या पुस्तकात इतिहास रचला. वृंदा घनश्याम राठी या भारताच्या पहिल्या महिला कसोटी पंच ठरल्या. वृंदाची ही भारतीय महिला संघाची नऊ। वर्षांतील पहिली मायदेशी कसोटी खास ठरली.वृंदाचा जन्म ज्या शहरात झाला, त्या नवी मुंबईत तिने कसोटी क्रिकेट पंचगिरी क्षेत्रात पदार्पण केल्याने हा प्रसंग तिच्यासाठी अधिक खास झाला असावा.२०१४ मध्ये वृंदाने मुंबई क्रिकेट संघटनेने घेतलेल्या पंचांची परीक्षा उत्तीर्ण केली. तिने चार वर्षांनंतर २०१८ मध्ये भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने घेतलेली पंच परीक्षाही उत्तीर्ण केली.

तेव्हापासून, ३४ वर्षीय वृंदाने १३ महिला वन-डे व ४३ महिला टी- २० मध्ये काम केले आहे. २०२० मध्ये तिला २०२० मध्ये पंचांच्या आयसीसी विकास पॅनेलमध्ये पदोन्नती देण्यात आहेत.आली. २०२२ मध्ये वृंदा राठी इंग्लंडमधील बर्मिंगम येथे राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतपंच म्हणून काम केले.वृंदा राठी या वर्षात एकामागून एक पंचगिरी क्षेत्रात विक्रम करत आहे. १० जानेवारी २०२३ रोजी, नारायणन जननीसह ती भारतातील पुरुषांच्या देशांतर्गत सामन्यात मैदानी पंच म्हणून उभी राहणारी पहिली महिला पंच ठरली. ही जोडी २०२२-२३ रणजी करंडक हंगामातील गोवा व पाँडेचेरी यांच्यातील सामन्यात पंच म्हणून उभी राहिली होती.२०२३ मध्ये, वृंदा राठीने दक्षिण आफ्रिकेतील महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत भूमिका बजावली. वृंदा पहिल्याच महिला प्रीमियर लीगच्या अंतिम सामन्यात उभी राहिली व चीनमधील हँगझोऊ येथे झालेल्या आशियाड क्रीडा स्पर्धेतही भूमिका बजावली. वानखेडे स्टेडियमवर भारत आणि इंग्लंड यांच्यात नुकत्याच झालेल्या टी-२० मालिकेतही वृंदा उभी होती. इंग्लंडविरुद्धच्या या कसोटीत वृंदा राठीशिवाय के. एन. अनंतपद्मनाभन हे इतर मैदानावरील पंच आहेत. वीरेंद्र शर्मा हे तिसरे पंच आहेत, तर जी. एस. लक्ष्मी सामनाधिकारी