हॉटेलमध्ये वेटर काम करून गिरिम्या राऊत झाला डॉक्टर

अक्कलकुवा : तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठी येथील डॉ. गिरिम्या रोता राऊत आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने लहानपणापासूनच अक्कलकुवा येथील एका चहाच्या हॉटेलवर वेटरचे काम करून मनामध्ये डॉक्टर होण्याची जिद्द पूर्ण करण्यासाठी धडपडत होता. अखेर त्याच्या प्रयत्नाला यश आले व तो वैद्यकीय शिक्षणातील बी.ए.एम.एस ही पदवी प्राप्त करून आज अक्कलकुवा तालुक्यातील काठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत झाला असल्याने इतरांना आदर्श घालून दिला आहे.तालुक्यातील आदिवासी लोकांची आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे अनेक होतकरू विद्यार्थी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी स्वतः काम धंदा करून शिक्षण पूर्ण करत असतात. अशाच प्रकारचे उदाहरण म्हणजे डॉ. गिरिम्या रोता राऊत

हे एक म्हणावे लागतील. लहानपणी अक्कलकुवा येथील चहाच्या हॉटेलवर काम करून त्यांनी काम केले कमी वयातच वडिलांचे निधन झाले. आर्थिक परिस्थिती बेताची झाली. फक्त एक दोन एकर कोरडवाहू शेती. जिवनात गरिबीत झुंज देत विविध ठिकाणी आश्रम शाळेत शिक्षण घेऊन शिक्षण पूर्ण करायचा प्रयत्न केला. व सुट्टी मध्ये घरी आल्यानंतर हॉटेलवर काम करून पैसे कमवून त्याचा उपयोग शैक्षणिक कामासाठी करून घेतला. गुण चांगले असल्यामुळे बारावीनंतर औरंगाबाद येथील वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळाला व वैद्यकीय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर धुळे व जळगाव जिल्ह्यात इंटर्नशिप करून आज अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील काठी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात सामुदायिक आरोग्य अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. अशा कष्ट करून शिक्षण घेणाऱ्या डॉ. गिरिम्या राऊत यांच्यापासून तरुणांनी आदर्श घेण्यासारखा आहे.

लहानपणापासून डॉक्टर होण्याची जिद्द मनामध्ये असल्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची असल्याने दोन पैसे कमावण्यासाठी हॉटेलमध्ये काम केले व आश्रमशाळेत राहुन शिक्षण पूर्ण करून डॉक्टर होण्याचे स्वप्न पूर्ण केले.
याचे मला खुप समाधान वाटते. आपल्या प्रगतीत आर्थिक परिस्थितीचा अडथळा न मानता त्यावर मात करून ध्येय गाठले पाहिजे.
– डॉ. गिरिम्या राऊत (सामुदायिक वैद्यकीय अधिकारी, काठी अक्कलकुवा