होळीच्या सणाला हार कंगणचा गोडवा

जळगाव :  इंग्रजी नववर्षातील हिंदूचा पहिला सण म्हणजे होळी. दूर्मूणांवर मात करण्याचा आणि उन्हाळा सुखकर करण्याचा सण म्हणजे होळी. होळीला साखरेचे हार व कंगण दिले जातात. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत साखरेच्या हार कंगणाला ग्राहकांकडून मोठी मागणी असते. सध्या बाजारात होलसेलमध्ये हारकंगण १५० रूपये किलो तर किरकोळमध्ये २०० ते २५० रूपये किलो याप्रमाणे विक्री होत आहे. रविवार, २४ रोजी होळी आहे. त्यानिमित्ताने शहरात सुमारे ४० परिवार हारकंगण बनवित आहेत. यातून एका दिवसाला ४०० ते ५०० किलो हार व कंगण, नारळ तयार होत आहेत.

अमळनेरचे कारागीर जळगावात जळगाव शहर ही जिल्ह्याची मोठी बाजारपेठ असल्याने अमळनेरहून दीड महिन्यांसाठी अजिज करीम हलवाई हे येत आहेत. कासमवाडीत | त्यांनी पत्र्याच्या शेडमध्ये हारकंगण बनवण्याची भट्टी लावली आहे. त्यांच्याकडे जळगावसह अमळनेर व शहादा येथील कारागीर काम करत आहेत. तर जुन्या जळगावसह मेहरूणमध्ये हार कंगण तयार करण्यात येत आहेत. यातील काही कारागारी हे पिढ्यानपिढ्या काम करीत असतात. तयार केलेला माल हा विविध गावात होणाऱ्या यात्रेत विकत असतात. तर काही कारागीर हे सिझनेबल व्यवसाय करीत असतात.

जिल्ह्याभरातील किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी होळीनिमित्त शहरासह ग्रामिण भागातील किरकोळ विक्रेते शहरात येत पंधरा ते तीस किलोप्रमाणे हारकंगण व साखरेचे नारळ घेवून जातात. त्यांची विक्री झाली तर लगेच.पुन्हा येत नविन खरेदी केली जाते. अनेक हातांना मिळतो रोजगार या उद्योगातून अनेक हातांना मिळाला रोजगार मिळतो. दररोज दोन ते साडेतीन क्विंटल हार-कंगण तयार होतात. यंदा व्यावसायिकांना विक्रीसाठी १०० ते १२० रुपये किलो असा होलसेलचा दर आहे. आकर्षक साच्यातील हार, कंगण, साखरेचे नारळ तयार करण्यासाठी १५ कामगार काम करीत आहेत. यात कुटुंबातील सदस्यांसह बाहेरील कामगारांचा समावेश आहे.

सिझनेबल व्यवसाय असल्याने होळीच्या पंधरा
दिवसाआधी कारांगीरांची जमवाजमव केली जाते. मागील वर्षाची विक्री आणि शिल्लक माल, आजचे भाव यांचा अंदाज घेत हारकंगणाचे दर ठरवतो. होळी ते गुढीपाडव्यापर्यंत हा व्यवसाय चालतो. नंतर दुसरा व्यवसाय करतो. अजिज करीम हलवाई, अमळनेर