ऑक्टोबर महिना आता संपणार आहे.अश्यातच प्रत्येक महिन्याच्या १ तारखेला काही महत्वाचे बदल होत असतात.आता १ नोव्हेंबर हा दिवस अनेक अर्थांनी खास आहे. या तारखेपासून होणाऱ्या बदलांमुळे त्याचा परिणाम थेट सर्वसामान्यांच्या खिशावर होणार आहे.
एलपीजी सिलिंडरच्या किमतीत होणार बदल
महिन्याच्या सुरवातीला म्हणजेच १ तारखेला एलपीजी सिलिंडरच्या किमतीत बदल होतो. मात्र यावेळी पाच राज्यांतील निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घरगुती सिलिंडरच्या किंमत होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. याशिवाय काही विमा कंपन्यांनी केवायसी अनिवार्य केले आहे. त्यासाठीची शेवटची तारीखही उद्याच निश्चित केली जाणार आहे. तसेच बँक कर्जाच्या रकमेत काही रक्कम वाढवण्याच्या तयारीत आहे. ज्याची अंमलबजावणी १ नोव्हेंबरपासून करण्याचे नियोजन आहे.
केवायसी अनिवार्य होणार
१ नोव्हेंबरपासून भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने सर्व विमाधारकांना केवायसी करणे आता बंधन कारक केले आहे. ज्याचा थेट परिणाम तुमच्यावरती होणार आहे. तुम्ही नियमांचे पालन न केल्यास, तुमचा दावाही रद्द केला जाऊ शकतो. याशिवाय जे निर्धारित तारखेनुसार केवायसी करत नाहीत त्यांना काही शुल्कही भरावे लागू शकते.
आयात संबंधित अंतिम मुदत
सरकारने HSN 8741 श्रेणीतील लॅपटॉप, टॅब्लेट, वैयक्तिक संगणक आणि इतर इलेक्ट्रॉनिक वस्तूंच्या आयातीवर 30 ऑक्टोबरपर्यंत सूट दिली होती. जी 1 नोव्हेंबर रोजी संपत आहे. मात्र, याबाबत अद्याप निर्णय झालेला नाही.याशिवाय, बॉम्बे स्टॉक एक्सचेंज म्हणजेच बीएसईने 20 ऑक्टोबर रोजी जाहीर केले होते की ते 1 नोव्हेंबरपासून इक्विटी डेरिव्हेटिव्ह विभागावरील व्यवहार शुल्क वाढवणार आहेत. याचा परिणाम शेअर बाजारात काम करणाऱ्या लोकांवर होईल.