रावेर : प्रतिकूल परीस्थितीतून बाहेर पडून कुटूंबासाठी काहीतरी करण्याची उमेद जागवत बारामती येथे खाजगी कंपनीत कार्यरत मात्र रावेरातील रहिवासी असलेल्या जयेश सोपान मराठे (२३) या उमद्या तरुणाचे गुरुवारी हृदयविकाराने निधन झाल्याने रावेवासीयांना मोठा धक्का बसला. कुटूंबातील एकूलता एक असलेल्या भावावर बहिणीला अग्निडाग देण्याची वेळ आल्याने सारेच हळहळले. वडिलांच्या मृत्यूनंतर जवाबदारी आली जयेशच्या खांद्यावर जयेश गेल्या पंधरा दिवसांपूर्वीच पुणे येथून हॉस्पिटलमधून ब्रेन स्ट्रोकच्या झटक्यातून बरा होऊन नुकताच रावेरात स्वगृही परतला परंतु गुरुवारी सकाळी अचानक छातीत दुखायला लागल्याने हॉस्पिटलमध्ये नेतांना त्याचे निधन झाले.
जयेश मराठे या तरुणाचे मूळ गाव साकळी, ता. यावल आहे. जयेशच्या कुटूंबाची परीस्थिती बेताची असल्याने नोकरीच्या शोधात पाच वर्षांपूर्वी त्याचे वडील सोपान मराठे, त्यांची पत्नी उषाबाई मराठे, मुलगी खुशी व मुलगा जयेश याला घेऊन रावेर शहरात आले होते. आर्थिक परीस्थितीपुढे हात टेकत तीन वर्षांपूर्वी वडील सोपान मराठे यांनी आत्महत्या केली. त्यामुळे विधवा आई आणि लहान बहिणीला सांभाळण्याची जबाबदारी जयेशच्या खांद्यावर होती. जयेश बारामती येथे एका खाजगी कंपनीत कामाला होता. कुटूंबासाठी नवीन घर घेण्याचे त्याचे स्वप्न होते परंतु १५ दिवासांपूर्वी त्याला डोकेदुखीचा त्रास जाणवलयानंतर पुणे हॉस्पिटलमध्ये कंपनीतील कर्मचाऱ्यांनी हलविले.
सर्व तपासण्या करण्यात आल्यावर त्याला ब्रेन स्ट्रोक सारखी लक्षणे जाणवली. ऑपरेशन केल्यानंतर तो घरी परतला मात्र गुरुवारी सकाळी त्याला छातीत दुखायला लागले. त्याचे मामा त्याला हॉस्पिटलमध्ये घेऊन जात असताना त्याने मामा जितू महाजन, योगेश महाजन व किशोर महाजन यांना माझ्या आई व बहिणीचे कसे होणार ? म्हणत जगाचा निरोप घेतला. जयेशच्या अकाली निधनाने कुटूंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. जयेशची आई मजूरी करते