३३ वर्ष जुना पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कन्याकुमारीतील ‘तो’ फोटो व्हायरल, पाहून युजर्स म्हणाले, “तुम्ही धन्य आहात”

या ध्यानधारणेसाठी नरेंद्र मोदी परवा (३० मे) संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत म्हणजेच शनिवार संध्याकाळपर्यंत विवेकानंद स्मारकात मौन धारण करून ध्यानधारणा करत आहेत.

 

लोकसभा निवडणुकीचा प्रचार पूर्ण झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोंदी यांनी ध्यानधारणा करण्याची घोषणा केली होती. लोकसभा निवडणुकीचा अखेरचा टप्पा १ जून रोजी (आज) पार पडला असून पंतप्रधान नरेंद्र मोदींनी परवापासून (३० मे) ध्यानधारणेला सुरुवात केली आहे. ही ध्यानधारणा ४८ तासांची आहे; तसेच या ध्यानधारणेसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी कन्याकुमारी येथे दोन दिवसांपूर्वीच पोहोचले आहेत.

या ध्यानधारणेसाठी नरेंद्र मोदी परवा (३० मे) संध्याकाळपासून १ जूनच्या संध्याकाळपर्यंत म्हणजेच शनिवार संध्याकाळपर्यंत विवेकानंद स्मारकात मौन धारण करून ध्यानधारणा करत आहेत. आज त्यांच्या ध्यानधारणेचा शेवटचा दिवस आहे. मोदींच्या ध्यानधारणेदरम्यानचे काही फोटो सोशल मीडियावर खूप व्हायरल झाले होते, ज्यात त्यांनी भगवे वस्त्र, हातात रुद्राक्षाची माळ, कपाळावर भस्म लावलेले दिसत आहे. या फोटोनंतर सोशल मीडियावर नरेंद्र मोदी यांचा आणखी एक फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

सध्या व्हायरल होणारा हा फोटो जवळपास ३३ वर्ष जुना असून पंतप्रधान मोदींचा व्हायरल होत असलेला हा फोटो ११ डिसेंबर १९९१ या दिवशीचा आहे. हा फोटो एकता यात्रेमधील असून यात्रा कन्याकुमारीमधील प्रतिष्ठित विवेकानंद रॉक मेमोरियलपासून सुरू झाली होती आणि काश्मीरमध्ये या यात्रेची सांगता झाली होती. या फोटोमध्ये तुम्ही पाहू शकता, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते डॉ. मुरली मनोहर जोशी दिसत आहेत. यावेळी हे दोन्ही नेते स्वामी विवेकानंद यांच्या प्रतिमेला श्रद्धांजली अर्पण करताना दिसत आहेत. या एकता यात्रेची समाप्ती २६ जानेवारी १९९२ रोजी श्रीनगरमध्ये तिरंगा झेंडा फडकवल्यानंतर झाली होती.

 

पंतप्रधान मोदींचा व्हायरल होत असलेला हा फोटो ११ डिसेंबर १९९१ या दिवशी एकता यात्रेमधला आहे. ही यात्रा कन्याकुमारीमधील प्रतिष्ठित विवेकानंद रॉक मेमोरियलपासून सुरू झाली होती. काश्मीरमध्ये या यात्रेची सांगता झाली. या एकता यात्रेचे नेतृत्व भाजप नेते मुरली मनोहर जोशी यांनी केले होते. नरेंद्र मोदी यांनी या यात्रेच्या आयोजनात मुख्य भूमिका बजावली होती. जवळपास १४ राज्यांतून या यात्रेचा प्रवास झाला होता. राष्ट्रीय एकतेचा संदेश या यात्रेतून देण्यात आला होता.

हा व्हायरल फोटो Xवरील @Modi Archive या अकाउंटवर शेअर करण्यात आला असून याला आतापर्यंत ८८ हजारांहून अधिक व्ह्यूज मिळाल्या आहेत. तसेच यावर अनेक लाइक्स आणि कमेंट्सदेखील युजर्स करताना दिसत आहेत. यावर एकाने लिहिलंय की, “मोदीजी तुम्ही खरंच धन्य आहात”. तर दुसऱ्या एकाने लिहिलंय की, “ग्रेट लीडर आहेत मोदीजी”.