नाशिक : चालत्या बसला अचानक आग लागल्याचे विडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. सूत्रानुसार, शहादावरून मुंबईला जाणाऱ्या बसला आग अचानक लागली. या बसमध्ये ३५ प्रवाशी होते, बस चालकाच्या सतर्कतेमुळे या प्रवाशांचे प्राण वाचले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, शहादावरून मुंबईला जाणाऱ्या बसला चांदवड तालुक्यातील राहुड घाटात अचानक आग लागली. या आगीने बघता बघता रौद्र रूप धारण करत बसला कवेत घेतले. यावेळी बस चालकाने सतर्कता दाखवत बस महामार्गाच्या कडेला उभी करत, बस मधील ३५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले.
यावेळी मंगरूळ टोल नाक्यावरील अग्निशमन दलाच्या गाडीने त्वरित घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवल्याने पुढील अनर्थ टळला. नाशिक जिल्ह्यात बसला आग लागण्याच्या घटनेत दिवसेंदिवस वाढत असून बसेसला आग का लागत आहे? याची सखोल चौकशी करण्याची गरज आहे.