कासोदा : येथिल हरिनाम सप्ताह पंचमडळाने गेल्या ७० वर्षापासून हरिनाम सप्ताह ची स्थपनाची परंपरा कायम ठेवली आहे. दिनांक ११ सप्टेंबर रोजी ५ वाजता ब्रम्हमुहर्तावर भाद्रपद शुद्ध अष्टमीला गावातील ५ जोडप्यांद्वारा पुजा करण्यात येते. या वर्षी संदीप मराठे , विठ्ठल रतन चौधरी, नंदू शिंदे, सागर मनोहर वाणी, एकनाथ भिला ठाकरे यांच्या हस्ते ही पूजा करण्यात आली.
परंपरेनुसार या पुजेचे पौरोहित्य गणेश जोशी यांनी केले. १९५४ साली या हरिनाम सप्ताह ची सुरुवात प. पू. गोविंद महाराज यांच्या हस्ते स्थापना करून करण्यात आली होती. हिच पंरापरा कायम आहे.
११ सप्टेबर रोजी स्थापना होवून सप्ताहाची सांगता आज १८ सप्टेबर रोजी होत आहे. रोज सकाळ व संध्याकाळ हरिपाठ रात्री र्कितन करण्यात येईल. बुधवार, १८ सप्टेबर रोजी सकाळी ६ वाजता काकडा आरती होऊन ११ वाजता काल्याचे र्कितन व त्या नंतर महाप्रसाद होतो. संध्याकाळी ६ वाजता आरती होवून पालखी मिरवणूक व त्यानतर स्पर्धात्मक भारूडाचा कार्यक्रम अश्या प्रकारे सप्ताह कार्यक्रम दरवर्षी साजरा करण्यात येतो .
र्कितन सप्ताह दि. ११ रोजी किशोर महाराज कासोदेकर ), १२ रोजी एकनाथ महाराज सदगिरकर ( ठाणे ), १३ रोजी नितिन महाराज( मलकापुरकर ), १४ रोजी सुधाकर महाराज( पैठणकर), १५ रोजी ज्ञानेश्वर महाराज बोगिर( नांदगावकर) , १६ रोजी विश्वनाथ महाराज (वाडेकर), १७ रोजी विश्वनाथ महाराज कोल्हे ( चिखल होळकर ), १८ रोजी सकाळी ८ वाजता विश्वनाथ महाराज कोल्हे यांचे काल्याचे र्कितनाने सप्ताहाची सांगता होणार आहे.
५० हजार भाविक
दरवर्षी ५० हजार भाविक महाप्रसादाचा लाभ घेत असतात. कासोदा परिसरातील ३६ खेडी व सपूर्ण महाराष्ट्रातून भाविक या सप्ताहासाठी येत असतात. गावातील सर्व माहेरवासीन, नातेवाईक बदलून गेलेले अधिकारी, सेवेतून निवृत्त झालेले कर्मचारी देखिल या सप्ताहास आवर्जून उपस्थितीत राहतात.
श्रमदानाची पंरापरा
या सप्ताह कार्यक्रमासाठी प्रत्येक व्यक्ती आपआपल्या परिने श्रमदान करत असतो. महाप्रसाद तयार करणे भाविकांना वाढणे, ही सर्व कामे लहान मोठी अधिकारी व पदाधिकारी कर्तव्य म्हणून करतात. महिलांची उपस्थिती लक्षणिय असते.
तलावाच्या पाण्याची विशेषतः
वर्ष भर तलावाच्या पाण्याचा वापर हा वापरण्यासाठी केला जातो परतू फक्त सप्ताहाच्या सांगता च्या दिवशी याच तलावाच्या पाण्याने मसालेवरण भात,गावराणी तुपाचा शिरा हा महाप्रसाद तयार केला जातो आणि तो शिजतो हे विशेष मानले जाते.
भव्य पालखी मिरवणूक
ग्रामिण भागात सर्वांत भव्य मिरवणूक ही येथिल भगवान विष्णुच्या पालखी ची मिरवणूक असते.ढोल तासे लेझीम मंडळ विविध प्रकारचे पौराणिक पोषाख ‘ सोंगं हे साऱ्या मिरवणूकीचे लक्ष वेधून घेत असतात .
हिंदू-मुस्लीम ऐक्य
या सप्राहाच्या पालखी मिरवणूकीचे श्रीफळ देवून मुस्लीम पंच कमेटी कडुन स्वागत केले जाते. व दोन्ही समाज सामंजस्याने हा उत्सव साजरा करतात. या ठी मोठा पोलीसाचा फौजफाटा उपस्थितीत असतो.
पंचमंडळ
प्रत्येक वर्षी या उत्सवासाठी पंच मंडळाची नियुक्ती केली जाते . यावर्षी अध्यक्ष – सोनू शेलार उपाध्यक्ष – वात्मिक ठाकरे व अशोक घोडके . सचिव – रविंद्र मोरे संतोष चौधरी खजिनदार – गोपाल पांडे याची नियुक्ती केली आहे . या सह ५१ सदस्याची कार्यकारणी व भाविक श्रद्धेने सहभाग घेत असतात .