आता महाकाय ई-कॉमर्स कंपनी ॲमेझॉनवर स्वस्तात वस्तू मिळणे कठीण होणार आहे. Amazon वर वस्तू विकणाऱ्यांचे बजेट खराब होऊ शकते. ई-कॉमर्स कंपनीने सेलर फी (Amazon Seller Fees) वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 7 एप्रिलपासून ॲमेझॉनवर वस्तू विकणाऱ्यांना या निर्णयाचा फटका बसणार आहे.
या वस्तूंवर शुल्क वाढणार आहे
रिपोर्टनुसार, कार इलेक्ट्रॉनिक्स, कॅमेरा ॲक्सेसरीज, कीबोर्ड आणि माऊस आणि पर्सनल केअर उत्पादनांच्या किमतीत बदल होणार आहे. याशिवाय सौंदर्य उत्पादनांवर ६.५ टक्के, किराणा मालावर ९ टक्के, दरवाजा आणि खिडकीवर १० टक्के आणि थ्रीडी प्रिंटरवर १० टक्के शुल्क वाढवण्यात आले आहे. याशिवाय काही उत्पादनांवरील शुल्कही कमी करण्यात आले आहे. आता इन्व्हर्टर आणि बॅटरीवर 4.5 टक्के शुल्क आकारण्यात येणार असून सुगंधावर 12.5 टक्के शुल्क आकारण्यात येणार आहे.