1 फेब्रुवारीपासून बँकेच्या नियमात होणार ‘हे’ मोठे बदल

जानेवारी महिना आता संपत आला असून. पुढील महिन्यात म्हणजेच १ फेब्रुवारीला अंतिम अर्थसंकल्प सादर करण्यात येणार आहे, अशातच बजेटसोबत इतर अनेक मोठ्या नियमात बदल होण्याची शक्यता आहे.याचा परिणाम नागरिकांच्या खिश्यावरती होणार आहे.

एसबीआय होम लोन ऑफर
सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठी बँक स्टेट बँक ऑफ इंडिया आपल्या ग्राहकांसाठी विशेष मोहीम राबवत आहे. ज्यामध्ये ग्राहकांना होम लोनवर 65 bps ची विशेष सूट मिळणार आहे . एवढेच नाही तर ग्राहकांसाठी प्रक्रिया शुल्कात सूट देण्याची तरतूद आहे. मात्र, ग्राहकांना या विशेष सवलतीचा लाभ 31 जानेवारीपर्यंतच मिळणार आहे. १ फेब्रुवारीपासून तुम्हाला कोणत्याही सवलतीचा लाभ दिला जाणार नाही.

IMPS या नियमांमध्ये बदल करण्यात आला
१ फेब्रुवारीपासून IMPS च्या नियमांमध्ये महत्त्वाचे बदल होणार आहेत. NPCI नुसार, आता कोणतीही व्यक्ती कोणत्याही लाभार्थीचे नाव न जोडता 5 लाख रुपयांपर्यंतचे निधी हस्तांतरित करू शकते. यासाठी यापूर्वीच अधिसूचना जारी करण्यात आली आहे. नवीन नियम 1 फेब्रुवारीपासून लागू होणार आहेत. नियमांमध्ये बदल केल्यानंतर, आता तुम्ही खातेधारकाचा खाते क्रमांक आणि मोबाइल क्रमांक जोडून एका खात्यातून दुसऱ्या खात्यात 5 लाख रुपयांपर्यंतची रक्कम ट्रान्सफर करू शकता.

पंजाब सिंध बँक स्पेशल एफडी चा बदलणार नियम
पंजाब अॅन्ड सिंध बँक (PSB)स्पेशल एफडी धनलक्ष्मी ४४४ डेज ची अंतिम तारीख ३१ जानेवारी २०२४ आहे. एफडीचे खाते उघडण्यासाठी पात्र असलेले निवासी भारतीय NRO/NRE ठेव खातेधारक PSB धन लक्ष्मी नावाची ही विशेष FD योजना उघडण्यासाठी अर्ज करू शकतात.

NPS खात्यातून पैसे काढण्याचे बदलणार नियम 
PFRDA ने NPS खात्यातून पैसे काढण्याच्या नियमात मोठा बदल केला आहे. 12 जानेवारी 2024 रोजी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार, NPS खातेधारक एकूण जमा केलेल्या रकमेपैकी केवळ 25 टक्केच काढू शकतील. याच्या मदतीने त्या खात्यातूनच पैसे काढता येतात. जे किमान तीन वर्षांचे असेल. याशिवाय पैसे काढण्याचे कारण वैध असल्याचे बंधनकारक करण्यात आले आहे.