महाराष्ट्र: महाराष्ट्र्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा यंदा सुरळीत पार पडल्या.असून आता सर्वांचे लक्ष हे निकालाकडे लागले आहे. या वर्षी दहावी आणि बारावीचा संदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून लवकरच दहावी आणि बारावीचा निकाल जाहिर केला जाऊ शकतो. अगोदर बारावीचा निकाल जाहिर होण्याची शक्यता आहे आणि त्यानंतर दहावीचा निकाल जाहिर होऊ शकतो.
कुठे पाहता येईल निकाल?
विद्यार्थी दहावी आणि बारावीचा निकाल mahahsscboard.in आणि mahresult.nic.in या साईटवर जाऊन बघू शकतात. निकाल बघण्यासाठी विद्यार्थ्यांकडे त्यांचा परीक्षा क्रमांक असणे आवश्यक आहे. रिपोर्टनुसार यंदा दहावी आणि बारावीचा निकाल हा ‘मे’च्या दुसऱ्या आठवड्यात लागू शकतो. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून अजून कोणतीही तारीख ही जाहिर करण्यात नाही आली.
राज्यात यंदा बारावीची परीक्षा 21 फेब्रुवारीपासून सुरु झाली तर दहावीची परीक्षा 1 मार्च पासून सुरू झाली होती. 14 लाख 28 हजार विद्यार्थ्यांनी बारावीच्या परीक्षेसाठी अर्ज भरले होते.दहावी आणि बारावीच्या मिळून एकून 31 लाख विद्यार्थ्यांनी यंदा परीक्षा दिलीये. आता विद्यार्थ्यांसह पालकांना फक्त आणि फक्त परीक्षेच्या निकालाचे वेध लागल्याचे बघायला मिळत आहे. एकदा निकाल लागला की, विद्यार्थ्यांसह पालकांची धावपळ प्रवेशासाठी सुरू होते. यंदा निकालाचा टक्का वाढणार का? हे देखील पाहण्यासारखे नक्कीच ठरणार आहे.