महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून नुकताच दहावीच्या परीक्षेचा निकाल हा जाहीर करण्यात आलायं. यंदा विद्यार्थ्यांनी धमाकेदार कामगिरी केलीये. विशेष म्हणजे यावेळी राज्याचा दहावीचा निकाल 95.81 टक्के लागलाय. बारावीप्रमाणेच दहावीच्या निकालात देखील मुलींनीच बाजी मारलीये. मुलांपेक्षा मुलींची टक्केवारी निकालात अधिक आहे. दहावीचे विद्यार्थी हे दुपारी एक वाजता निकाल पाहू शकणार आहेत. आज ऑनलाईन पद्धतीने निकाल जाहीर होईल. यंदाच्या निकालात कोकण विभाग हा अव्वल ठरलाय. कोकण विभागाचा निकाल तब्बल 99 टक्के लागलाय.
दरम्यान, यंदा निकालादरम्यान एक मोठा बदल करण्यात आला आहे. यामुळे विद्यार्थ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. ज्या विद्यार्थ्यांना रिचेकिंगला टाकायचं आहे किंवा आपला उत्तर पत्रिका पाहायची आहे त्यासाठी काही बदल बोर्डनं केले आहेत. जे विद्यार्थी आणि पालकांसाठी खूप समजून घेणं महत्त्वाचे आहे.
एखाद्या विद्यार्थ्याला कमी मार्क पडले असतील किंवा त्याला वाटत असेल की पुन्हा रिचेकिंगला करायचं असेल तर त्यासाठी देखील तारखा जाहीर करण्यात आल्या आहेत. विद्यार्थ्यांना फोटो कॉपी हवी असेल तर त्यासाठी ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्यासाठी विद्यार्थ्यांना 28 तारखेपासून 11 जूनपर्यंत अर्ज करायचे आहेत. जवळपास ही 15 दिवसांची मुदत देण्यात आली आहे.
विद्यार्थ्यांना प्रति विषय 400 रुपये भरुन फोटो कॉपी घेता येणार आहे. दोन विषयाची फोटो कॉपी घेतली तर आणखी काही विषयाची फोटो कॉपी घेत असेल तर ती परवानगी देखील देण्यात येणार आहे. यापूर्वी फोटो कॉपीसाठी एकदाच अर्ज करता येत होता. मात्र आता विद्यार्थ्यांना दुसऱ्यांदा अर्ज करुन फोटो कॉपी घेण्याची संधी देण्यात आली आहे. विद्यार्थ्याने सहावेळा सहा विषयाची फोटो कॉपी घेतली किंवा एकदाच घेतली तरीही चालणार आहे. बोर्डाने यावर्षीच्या निकालात हा एक बदल केला आहे. अध्यक्ष राज्य मंडळ शरद गोसावी यांनी दिली महत्त्वाची माहिती.