राज्यात एसटी प्रवास महागला! तिकीट दरात १० टक्क्यांची वाढ

---Advertisement---

 

उन्हाळी सुट्ट्यांच्या पार्श्वभूमीवर राज्य परिवहन महामंडळाकडून एसटीने प्रवास करणाऱ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय जाहीर करण्यात आला आहे. राज्य परिवहन महामंडळाने १५ एप्रिलपासून तिकीट दरात १० टक्क्यांची वाढ लागू केली आहे. त्यामुळे सुट्यांमध्ये गावाकडे जाणाऱ्या प्रवाशांच्या खर्चात वाढ होणार आहे. विशेषतः लांब पल्ल्याच्या प्रवासासाठी सुमारे ९० ते १०० रुपयांपर्यंत अतिरिक्त भार पडण्याची शक्यता आहे.

महामंडळाने दिलेल्या माहितीनुसार, उन्हाळ्यात प्रवाशांची संख्या वाढते. त्यानुसार उत्पन्न वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. ही वाढ साधी, मिडी आणि जलद बस सेवांपुरती मर्यादित राहणार आहे. मात्र शिवनेरी, शिवशाही आणि ई-बस या सेवांच्या तिकीट दरात कोणताही बदल करण्यात आलेला नाही, त्यामुळे या सेवांचा वापर करणाऱ्यांना काहीसा दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, विद्यार्थी पास तसेच मासिक पासधारकांना या दरवाढीचा परिणाम होणार नाही. नियमित प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांना यामुळे अतिरिक्त आर्थिक ताण जाणवणार नाही, असेही महामंडळाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

जळगावहून मुख्य शहरांसाठी नवे तिकीट दर

जळगाव – पुणे : ६७४ वरून ७६३ रुपये
जळगाव – धुळे : १६२ वरून १७८ रुपये
जळगाव – नाशिक : ४३३ वरून ४७६ रुपये
जळगाव – छत्रपती संभाजीनगर : २८२ वरून ३१० रुपये
जळगाव – चाळीसगाव : १७२ वरून १८९ रुपये
जळगाव – मुक्ताईनगर : ११२ वरून १२३ रुपये

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---