पशुपतीनाथ मंदिरातून१०किलो सोन्याचे दागिने गायब!

 काठमांडू : नेपाळमधील पशुपतीनाथ मंदिरातून सोने चोरीचे प्रकरण समोर आले आहे. त्यानंतर तपास सुरू झाला आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, १००किलो दागिन्यांपैकी १० किलो सोने गायब झाले आहे. त्यानंतर लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंदिर परिसराचा ताबा तपासासाठी घेतला आहे. त्यामुळे रविवारी मंदिर भाविकांसाठी बंद ठेवण्यात आले होते.

पशुपतीनाथ मंदिर हे काठमांडूमधील सर्वात जुने हिंदू मंदिर आहे. १०किलो सोने गायब झाल्याचा संसदेत प्रश्न उपस्थित झाल्यानंतर सरकारने अधिकाराच्या दुरुपयोगाची चौकशी करण्याचे निर्देश दिले होते. मीडिया रिपोर्ट्सवर विश्वास ठेवला.

पशुपती क्षेत्र विकास प्राधिकरणाने दावा केला की….

त्यांनी जलहरी बनवण्यासाठी १०३ किलो सोने खरेदी केले होते, परंतु दागिन्यांमधून 10 किलो सोने गायब होते.  नेपाळमध्ये पशुपतीनाथ मंदिर हे सर्व मंदिरांमध्ये अग्रस्थानी मानलं जातं. पशुपतीनाथ या शब्दाची फोड केल्यास पशु म्हणजे ‘जीवन’ आणि पती म्हणजे ‘स्वामी’ थोडक्यात पशुपतीनाथ म्हणजे जीवनाची देवता असा अर्थ होतो. पशुपतीनाथ हे चार चेहरे असणारं लिंग आहे. याच्या पूर्वेकडील चेहऱ्याला तत्पुरुष आणि पश्चिमेकडील मुखाला सद्ज्योत असं म्हणतात. उत्तरेकडील चेहऱ्याला वामवेद आणि दक्षिणेकडील चेहऱ्याला अघोरी म्हणून संबोधतात. पशुपती नाथ मंदीर हेय संपूर्ण विश्वात प्रसिद्ध असणारे मंदिर आहे.पशुपतीनाथांचा दर्शन घेण्यासाठी संपूर्ण विश्वातून भाविक एक असतात.