तरुण भारत लाईव्ह धरणगाव: किरकोळ वादातून दोन चिमुकल्या मुलींचा पिता असलेल्या तरुणाच्या खून प्रकरणात अटकेतील 10 संशयित आरोपींना सोमवारी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे, तर फरार असलेल्या तिघांचा शोध सुरू आहे.
नेमकी काय घडली होती घटना?
31 डिसेंबरच्या रात्री 8.30 वाजता धरणगाव येथील कृष्णा जिनिंग येथे अरुण उर्फ कालू रमेश भिल (30, रा. तांडे, ता. शिरपूर) याचा खून झाला होता. रात्रभर परिसर पिंजून काढत पोलिसांनी 10 संशयित आरोपींना अटक केली होती, तर तीन संशयित फरार झाले होते. कृष्णा जिनिंगममधील काही तरुण शनिवारी रात्री ताट वाजवत होते. त्यावेळेस सखाराम पवार यांनी त्यांना ताट वाजवू नका, असे सांगितले. यावर वाद झाला असता सखाराम यांचा मामेभाऊ अरुण उर्फ कालू भिल हा त्या ठिकाणी पोहचला. तो भांडण सोडवत असताना संतोष महेश मंडल याने अरुण भिल यांच्या डोक्यात लाकूड मारले. यात तो गंभीर जखमी झाला. धरणगाव ग्रामीण रुग्णालयात डॉक्टरांनी त्यास मृत घोषित केले होते. याबाबत सखाराम पवार (भिल) याच्या फिर्यादीवरून धरणगाव पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
ही आहेत संशयित
आरोपींची नावे
संतोष महेश मंडल, राजेंद्र मंडल, उमेश उर्फ डमरू रघू जाधव, मंगलबिन नरेशबीन चव्हाण, राजीव जडुबीन चव्हाण, संदीप मुसाफिर जाधव, दिनेश रवीदास, धर्मेंद्र मंडल, रामविलास दास, आनंदी यादव यांना रात्रीच अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली, तर विनोद पारस, विनोद यादव आणि अखिलेश यादव या तिघां संशयित आरोपींचा शोध सुरू आहे.