---Advertisement---
जळगाव- इंडियन मेडिकल असोसिएशन तर्फे जळगावात दि. ४,५,६ नोव्हेंबर रोजी तीन दिवसीय राज्यस्तरीय महास्पोर्टसचे एकलव्य क्रीडा संकुल येथे आयोजन करण्यात आले आहे. त्यात राज्यातील 400 पेक्षा अधिक डॉक्टर खेळाडू नऊ प्रकारच्या खेळांच्या स्पर्धेत सहभागी होत आहे. दि. ४ रोजी सकाळी आठ वाजता महास्पोर्टसचा शुभारंभ होणार आहे.
आयएमए जळगाव शाखेला दुसऱ्यांदा या स्पर्धेच्या आयोजनाची संधी लाभली आहे. या महास्पोर्टस मध्ये क्रिकेट, बॅटमिंटन, लॉन टेनिस, सायकलिंग, कॅरम, बुद्धिबळ, मॅरेथॉन आणि स्विमिंग यांच्या स्पर्धा होणार आहेत. क्रिकेटच्या स्पर्धेत १६ संघ सहभागी झाले असून त्यांचे एम. के. स्पोर्ट्सच्या जुन्या व नव्या दोन्ही मैदानांवर दिवसा तर एकलव्य क्रीडा संकुल व पोलीस ग्राउंड या दोन्ही ठिकाणी दिवस-रात्र पद्धतीने सामने होणार आहे. सायकलिंग व मॅरेथॉन वगळता सर्व सहा प्रकारच्या खेळांच्या स्पर्धा एकलव्य क्रीडा संकुलात आयोजित करण्यात आल्या आहेत. महास्पोर्टसच्या यशस्वीतेसाठी विविध समित्या आणि प्रत्येक क्रीडा प्रकारातील स्पर्धांसाठी समन्वयकांची घोषणा करण्यात आली आहेत.आयएमएचे राज्य अध्यक्ष डॉ. सुहास पिंगळे, सेक्रेटरी डॉ. मंगेश पाटे, एचबीआय सेक्रेटरी डॉ.अनिल पाटील यांच्या मार्गदर्शनात राज्य स्पोर्ट्स कमिटीचे चेअरमन डॉ. जितेंद्र नारखेडे, जळगाव शाखेचे अध्यक्ष डॉ. दीपक आठवले, सेक्रेटरी डॉ.जितेंद्र कोल्हे, कमिटी चेअरमन डॉ. स्नेहल फेगडे व संयोजन सचिव डॉ. पराग नाहाटा यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्य परिश्रम घेत आहे.