नवापूर प्रतिनिधी : गजमल तुळशीराम पाटील कनिष्ठ व वरिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार येथे सरदार वल्लभभाई पटेल जयंती व स्वर्गीय इंदिरा गांधी यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली.
यावेळी प्राचार्य डॉ.एम.जे.रघुवंशी यांच्या हस्ते प्रतिमेस माल्यार्पण करण्यात आले.या प्रसंगी मत मांडताना सरदार वल्लभभाई पटेल व स्व. इंदिरा गांधी यांच्या कार्याला उजाळा देत. राष्ट्रीय एकता हेच राष्ट्रीय शांततेची प्रतीक आहे. संघटितपणाच राष्ट्राला बळकट करीत असतो. असे प्रतिपादन त्यांनी केले.
या कार्यक्रमास कनिष्ठ महाविद्यालयाचे उपप्राचार्य एन.जे.सोमाणी व अधीक्षक सुदेश रघुवंशी यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी गुजरात राज्यातील मोरवीजवळ असलेला पूल तुटल्यामुळे मोठी दुर्घटना घडली. या दुर्घटनेत मृत्यमुखी पडलेल्या लोकांना श्रद्धांजली वाह्ण्यात आली
.
राष्ट्रीय एकता दिवसाची शपथ राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी डॉ.मनोज शेवाळे यांनी दिली. तर सूत्रसंचालन व आभार प्रा.के.सी.साठे यांनी केले. या कार्यक्रमास प्राध्यापक, प्राध्यापकेतर कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी राष्ट्रीय सेवा योजना+2 विभाग यांनी परिश्रम घेतले.