पाचोरा : येथील न्यायालयाचे प्रांगणात तालुका विधी सेवा समिती पाचोरा व तालुका वकील संघ पाचोरा यांचे संयुक्त विद्यमाने २८ सप्टेंबर रोजी राष्ट्रीय लोकअदालतचे आयोजन करण्यात आले. हे आयोजन विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश के स्तर पाचोरा यांच्या अध्यक्ष जी. बी. औंधकर अध्यक्षतेखाली करण्यात आले होते.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये मुख्य न्यायाधीश जी.बी. औंधकर , सह न्यायाधीश एस. व्ही. निमसे, तसेच २रे सह न्यायाधीश जी. एस. बोरा यांच्या न्यायालयातील एकूण १०७ इतकी प्रकरणे निकाली होवून त्यात रक्कम रुपये ४४ लाख ३६ हजार ३६४ इतकी वसुली झाली आहे. त्याचप्रमाणे ६० इतके वादपूर्व प्रकरणांचा निपटारा होवून ४५ लाख ६२ हजार २७८/- इतका वसुल मिळालेला असून एकूण रक्कम रु. ८९ लाख ९८ हजार ६४२ इतका वसुल मिळाला आहे.
यशस्वीतेसाठी तालुका विधी सेवा समिती पाचोराचे अध्यक्ष तथा दिवाणी न्यायाधीश क. स्तर जी. बी. औंधकर, सह न्यायाधीश एस. व्ही. निमसे, २रे सह न्यायाधीश जी. एस. बोरा , लोकन्यायालयाचे पंच अॅड. प्रदीप सुर्यवंशी, पाचोरा वकील संघाचे अध्यक्ष अॅड. प्रविण बी.पाटील, उपाध्यक्ष अॅड. मंगेश गायकवाड, सचिव अॅड. निलेश सुर्यवंशी, सहसचिव अॅड. अंबादास गिरी, वकील संघाचे सर्व विधिज्ञ, पंचायत समितीचे विस्तार अधिकारी आर. एस. धस, ग्रामसेवक बैंक अधिकारी कर्मचारी, पाचोरा पोलीस स्टेशन व पिंपळगांव (हरेश्वर) पोलीस स्टेशनचे पोलीस अधिकारी व कर्मचारी तसेच न्यायालयिन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.
तसेच नागरीकांनी यापुढे देखील जास्तीत जास्त प्रमाणात लोकअदालतीमध्ये सहभागी व्हावे असे आवाहन केले आहे.