दहावी – बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल जाहीर; असा पहा निकाल

तरुण भारत लाईव्ह । २८ ऑगस्ट २०२३। महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने घेतलेल्या दहावी – बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल हा समोवारी दुपारी एक वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात आला. निकाल कुठे आणि कसा पहायचा हे जाणून घ्या तरुण भारतच्या माध्यमातून.

दहावी – बारावीच्या पुरवणी परीक्षेचा निकाल हा आज दुपारी एक वाजता जाहीर करण्यात आला. या संकेतस्थळावर तुम्हाला निकाल पाहता येईल. माहितीची प्रिंट आउट तुम्हाला घेता येईल. राज्य मंडळाच्या नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, पुणे, नाशिक, लातूर आणि कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत दहावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते १ ऑगस्ट, तर बारावीची पुरवणी परीक्षा १८ जुलै ते ८ ऑगस्ट, तर माहिती तंत्रज्ञान आणि सामान्यज्ञान विषयांची ऑनलाइन परीक्षा ९ आणि १० ऑगस्ट या कालावधीत आयोजित केली होती.

उत्तरपत्रिकेचे पुनर्मूल्यांकन करायचे असल्यास विद्यार्थ्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा, असे राज्य मंडळाने स्पष्ट केले आहे.