लग्न हा जीवनातील सर्वात मोठा निर्णय असतो. आपल्याला कोणी तरी समजून घ्यायला पाहिजे यासाठी आपण लग्न करतो,सुखा दुःखामध्ये कोणीतरी असावं म्हूणन आपण लग्न करतो. पण कदाचित त्याचा खरा अर्थ फक्त त्या लोकांनाच माहित असेल ज्यांचे अद्याप लग्न झालेले नाही, परंतु जगात असे काही लोक आहेत जे एकापेक्षा जास्त वेळा लग्न करण्याची इच्छा व्यक्त करतात.
मलेशियाच्या केलांटन राज्यातील एका छोट्या गावात राहणाऱ्या ११२ वर्षीय सिती हवा हुसीनने ८ व्यांदा लग्न करण्याची इच्छा व्यक्त केल्याने ती चर्चेत आली आहे. अशा स्थितीत प्रश्न पडतो की ही महिला लग्नाला विनोद मानते की गांभीर्याने घेते? सितीचे अनेक नातवंडांमध्ये काही मोठे झाले आहेत आणि काहींना मुलेही आहेत. मलेशियातील , महिलेला 19 नातवंडे आणि 30 पतवंडं आहेत.
ही महिला केलांटन राज्यातील तुंपत शहरातील रहिवासी आहे. या वयात लग्न करू इच्छिणाऱ्या या महिलेचीही एक अनोखी स्थिती आहे. तिच्या अटीनुसार जोपर्यंत कोणी पुरुष येऊन तिला प्रपोज करत नाही आणि तिच्याशी लग्न करण्याची इच्छा व्यक्त करत नाही तोपर्यंत ती लग्न करणार नाही. सितीने असेही सांगितले की तिच्या काही माजी पतींचा मृत्यू झाला आहे आणि काहींशी तिचे संबंध चांगले नव्हते ज्यामुळे ते वेगळे झाले. हे लक्षात घेण्यासारखे आहे की तिचे वय असूनही ती निरोगी आहे आणि तिचे काम स्वतः करते.