Pachora : पाचोरा विधानसभा मतदारसंघातुन 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात

#image_title

Pachora assembly constituency : राज्यातील विधानसभा निवडणुकांसाठी अंतिम लढती आज निश्चित झाल्या आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्यादिवशी अनेक मतदारसंघात बंडखोरांनी व अपक्ष उमेदवारांनी आज माघार घेतली आहे.

जळगाव जिल्यातील पाचोरा विधानसभा मतदार संघातून सुमारे 39 उमेदवारी अर्ज दाखल झाले होते. त्यापैकी 30 नोव्हेंबर रोजी झालेल्या छाननीत 24 उमेदवारांचे अर्ज वैध असल्याचे प्रशासनाच्या वतीने जाहीर करण्यात आले होते. आज विधानसभा निवडणुकीतून माघार घेण्याचा अखेरचा दिवस असल्याने पाचोरा विधानसभा मतदारसंघातून 12 उमेदवारांनी माघार घेतली असून, 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरले आहे.

यांनी घेतली माघार
1) श्री. उत्तमराव धना महाजन,
2) श्री. अफसर अकबर तडवी,
3) श्री. नरेद्रसिंग मुख्यारसिंग सुर्यवंशी,
4) श्री. नितीन नामदेव पाटील,
5) श्रीमती पुजा अमोल शिंदे,
6) श्री. संजय ओंकार वाघ,
7) श्री. विजय नरहर पाटील,
8) श्री. सचिन अशोक सोमवंशी,
9) शेखराजु शेख सलीम,
10) साबीर खान शब्बीर खान,
11) श्री. संदिप फकीरा जाधव,
12) श्री. हरिभाऊ तुकाराम पाटील.

हे 12 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
1) श्री. किशोर धनसिंग पाटील (शिव सेना,धनुष्यबाण), 2) श्रीमती वैशाली नरेंद्रसिंग सुर्यवंशी (शिवसेना-उबाठा,मशाल), 3) श्री. सतिष अर्जुन बिऱ्हाडे(बहुजन समाज पार्टी-हत्ती), 4) श्री. अमित मानखाँ तडवी (वंचित बहुजन आघाडी-गॅस सिलेंडर), 5) श्री. प्रताप हरी पाटील(महाराष्ट्र स्वराज्य पक्ष- सप्त किरणांसह पेनाची निब), 6) श्री मांगी इंडलिक पगारे (बहुजन महापार्टी-कॅरम बोर्ड), 7) श्री. अमोल पंडीतराव शिंदे (अपक्ष-गन्ना किसान), 8)श्री. अमोल शांताराम शिंदे (अपक्ष-रोड रोलर), 9) श्री. निळकंठ नरहर पाटील (अपक्ष-बॅट), 10)श्री. मनोहर आण्णा ससाणे (अपक्ष-नागरिक), 11)श्री. दिलीप ओंकार वाप (अपक्ष-शिट्टी), 12) श्रीमती वैशाली किरण सुर्यवंशी (अपक्ष-ऑटो रिक्षा).