---Advertisement---

Crime News: तेरा वर्षात 12 खून, अखेर ​’भुवा’चा झाला पोलीस कोठडीतच मृत्यू

by team
---Advertisement---

Crime News: सीरियल किलर नवल सिंग चावडा उर्फ ​​भुवा याचा अहमदाबादमध्ये पोलीस कोठडीत मृत्यू झाला. हा सीरियल किलर लोकांना तांत्रिक विधीच्या बहाण्याने आमिष दाखवून चौपट पैसे देण्याचे आश्वासन देत असे आणि नंतर विषारी द्रव्य पाजून त्यांची हत्या करायचा. भुवा याने आतापर्यंत 12 जणांची हत्या केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.

अहमदाबादच्या सरखेज पोलिसांनी सीरियल किलर नवल सिंगला अटक केली होती. दरम्यान त्यांचा कोठडीत मृत्यू झाला. आरोपी लोकांना तांत्रिक विधीद्वारे चौपट पैसे करून देण्याचे आमिष दाखवत असे आणि नंतर सोडियम नायट्रेट पाजून त्यांची हत्या करायचा. व नंतर मृतदेहाची विल्ल्हेवाट लावायचा.

पैशांचे आमिष देऊन घरी बोलवायचा

भुवा याने एक युट्युब चॅनलही बनवले होते, जिथून तो लोकांना तंत्र-मंत्राच्या नावाने बोलावून त्यांना सोडियम नायट्रेट पाजून त्यांची हत्या करायचा.आरोपी पाण्यात किंवा अल्कोहोलमध्ये सोडियम नायट्रेट मिसळून पैसे चौपट करण्यासाठी आलेल्या लोकांना ते प्यायला द्यायचा सोडियम नायट्रेट प्यायल्यानंतर 20 मिनिटांत हृदयविकाराच्या झटक्याने लोकांचा मृत्यू होत असे. तपासादरम्यान पोलिसांनी आरोपीची कसून चौकशी केली असता त्याने 12 खून केल्याची कबुली दिली. आरोपीला सात दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्याचा रिमांड 10 डिसेंबरला संपणार होता, मात्र रिमांड संपण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला आहे. ​​रविवारी सकाळी भुवाची तब्येत अचानक बिघडली. पोलीस कोठडीत भुवाला उलट्या होऊ लागल्या. पोलिसांनी त्याला तात्काळ जवळच्या रुग्णालयात नेले, तेथे डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्याला मृत घोषित केले. हा मृत्यू पोलीस कोठडीत झाला असल्याने न्यायालयीन चौकशी करण्यात येणार आहे.

13 वर्षात 12 खून

मृत्यूपूर्वी भुवाने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. भुवाने गेल्या 13 वर्षात 12 जणांची हत्या केल्याची कबुली दिली आहे. भुवाने सांगितले की, 12 पैकी तीन जण एकाच कुटुंबातील होते. असे त्याने पोलिसांना सांगितले आहे.

Join WhatsApp

Join Now
---Advertisement---

Leave a Comment