भुसावळ : प्रयागराज येथे होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानकांवर होणारी संभाव्य गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने भुसावळ विभागातून धावणाऱ्या १२ गाड्यांच्या मार्गात बदल केला आहे. या गाड्या नियोजित मार्गाऐवजी प्रयागराज छिवकी, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, लखनऊ, बीना आणि इटारसी मार्गाने धावतील. तसेच काही गाड्यांना प्रयागराज छिवकी येथे तात्पुरता थांबा प्रदान करण्यात आला आहे.
मार्ग बदललेल्या गाड्यांची माहिती
१) पवन एक्स्प्रेस (११०६१ / ११०६२)
लोकमान्य टिळक टर्मिनस – जयनगर पवन एक्स्प्रेस (११०६१) : १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मार्गात बदल राहील.
जयनगर – लोकमान्य टिळक टर्मिनस पवन एक्स्प्रेस (११०६२) : १८ ते २७ फेब्रुवारी रोजी मार्गात बदल राहील
हेही वाचा : भारतातलं असंही एक गाव, लग्नानंतर वधू सात दिवस राहते विवस्त्र, जाणून घ्या कुठली आहे ‘ही’ प्रथा
२) पुणे – दरभंगा एक्स्प्रेस (११०३३ / ११०३४)
पुणे – दरभंगा एक्स्प्रेस (११०३३) : १९ आणि २६ फेब्रुवारी रोजी मार्ग बदल.
दरभंगा – पुणे एक्स्प्रेस (११०३४) : २१ आणि २८ फेब्रुवारी रोजी मार्ग बदल.
३) कामायनी एक्स्प्रेस (११०७१ / ११०७२)
लोकमान्य टिळक टर्मिनस – वाराणसी कामायनी एक्स्प्रेस (११०७१) : १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, जौनपूर मार्गे वाराणसी.
वाराणसी – लोकमान्य टिळक टर्मिनस कामायनी एक्स्प्रेस (११०७२) : १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : जौनपूर, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस.
४) अयोध्या कॅट एक्स्प्रेस (२२१२९ / २२१३०)
लोकमान्य टिळक टर्मिनस – अयोध्या कॅट एक्स्प्रेस (२२१२९) : १८, २३ आणि २५ फेब्रुवारी रोजी मार्ग बदल.
नवीन मार्ग : वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ मार्गे अयोध्या कॅट.
अयोध्या कॅट – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (२२१३०) : १९, २४ आणि २६ फेब्रुवारी रोजी मार्ग बदल.
नवीन मार्ग : लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस.
५) बनारस एक्स्प्रेस (१२१६७ / १२१६८)
लोकमान्य टिळक टर्मिनस – बनारस एक्स्प्रेस (१२१६७) : १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, उन्नाव मार्गे बनारस.
बनारस – लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस (१२१६८) : १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : उन्नाव, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस.
६) काशी एक्स्प्रेस (१५०१७ / १५०१८)
लोकमान्य टिळक टर्मिनस – गोरखपूर काशी एक्स्प्रेस (१५०१७) : १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : इटारसी, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, लखनऊ, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ, जंघईमार्गे गोरखपूर.
गोरखपूर – लोकमान्य टिळक टर्मिनस काशी एक्स्प्रेस (१५०१८) : १८ ते २८ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : जंघई, माँ बेल्हा देवी धाम प्रतापगढ़, लखनऊ, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे लोकमान्य टिळक टर्मिनस.
७) वाराणसी एक्स्प्रेस (२२१७७ / २२१७८)
मुंबई – वाराणसी एक्स्प्रेस (२२१७७) : १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : इटारसी, बीना, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, कानपूर सेंट्रल, उन्नाव मार्गे बनारस.
वाराणसी – मुंबई एक्स्प्रेस (२२१७८) : १८ ते २७ फेब्रुवारी दरम्यान मार्ग बदल.
नवीन मार्ग : उन्नाव, कानपूर सेंट्रल, वीरांगना लक्ष्मीबाई झांसी, बीना, इटारसी मार्गे मुंबई.
रेल्वे प्रशासनाचा प्रवाशांना सल्ला
रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना यात्रेपूर्वी मार्ग आणि वेळेत बदल झाल्यास अधिकृत रेल्वे संकेतस्थळ किंवा रेल्वे हेल्पलाइनद्वारे माहिती घेण्याचा सल्ला दिला आहे.कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर हा बदल तात्पुरता असून गर्दी व्यवस्थापनासाठी हा निर्णय घेतला गेला आहे. प्रवाशांनी गैरसमज टाळावा आणि अधिकृत रेल्वे सुचनांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.