10वी आणि 12वी कॉपीमुक्त परीक्षा; जळगाव जिल्ह्यात लाईव्ह स्ट्रीमिंग, ड्रोन अन् चोख पोलीस बंदोबस्त

---Advertisement---

 

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने उद्यापासून (दि. 10 फेब्रुवारी) 12वीच्या परीक्षांना सुरुवात होत असून, 20 फेब्रुवारीपासून 10वीच्या परीक्षाही सुरू होणार आहेत. या पार्श्वभूमीवर जळगाव जिल्ह्यात यंदा परीक्षा कॉपीमुक्त आणि पारदर्शक व्हाव्यात, यासाठी प्रशासनाने कडक उपाययोजना राबविण्याचा निर्णय घेतला आहे.
जिल्ह्यातील प्रत्येक परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्त, भरारी पथके, ड्रोन कॅमेरे तसेच काही ठिकाणी लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारे नजर ठेवली जाणार आहे. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी प्रशासन पूर्णपणे सज्ज असल्याचे सांगण्यात आले.
जळगाव जिल्ह्यात 10वीसाठी 147 परीक्षा केंद्रांवर तब्बल 59 हजारांहून अधिक विद्यार्थी, तर 12वीसाठी 82 केंद्रांवर 48 हजारांपेक्षा जास्त विद्यार्थी परीक्षेला सामोरे जाणार आहेत. विज्ञान, कला, वाणिज्य तसेच व्यावसायिक अभ्यासक्रमातील विद्यार्थी मोठ्या संख्येने प्रविष्ट झाले आहेत.
दरम्यान, परीक्षा काळात परीक्षा केंद्राच्या 500 मीटर परिसरातील झेरॉक्स सेंटर बंद ठेवण्याचे आदेश देण्यात आले असून, अखंडित वीजपुरवठ्यासाठी महावितरणला विशेष सूचना देण्यात आल्या आहेत.
विद्यार्थ्यांनी कोणताही तणाव न घेता, शांत आणि सुरक्षित वातावरणात परीक्षा द्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्यात येईल.

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---

 

---Advertisement---