तरुण भारत लाईव्ह । २५ मे २०२३। बारावीचा निकाल गुरुवारी दि. २५ जाहिर होणार आहे. विद्यार्थ्यांना निकाल पाहण्यासाठी वेगवेगळया पाच संकतेस्थळ देण्यात आले असल्याची माहिती महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या वतीने देण्यात आली. पुणे, नागपूर, औरंगाबाद, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या ९ विभागाचा निकाल जाहिर होणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च २०२३ मध्ये घेण्यात आलेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (१२ वी) परीक्षेचा निकाल गुरूवारी दुपारी दोन वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येईल. गेल्या काही दिवसांपासून असलेली निकालाची प्रतिक्षा संपली आहे.
mahresult.nic.in