महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून उच्च माध्यमिक प्रमाणपत्र 12 वी परीक्षा 2024 चा निकाल आज, 21 मे रोजी जाहीर केला जाईल. महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल सकाळी 11 वाजता जाहीर केला जाईल आणि निकाल पाहण्याची लिंक mahresult.nic.in, hscresult.mkcl.org आणि mahahsscboard.in या अधिकृत वेबसाइटवर दुपारी 1 वाजता सक्रिय केली जाईल. त्यानंतर विद्यार्थी त्यांचे स्कोअरकार्ड तपासू शकतात.
निकाल कसा तपासायचा
बारावीचा निकाल महाराष्ट्र बोर्डाच्या अधिकृत वेबसाईट mahresult.nic.in वर जाहीर केला जाईल. निकाल जाहीर झाल्यानंतर, विद्यार्थी रोल नंबरद्वारे त्यांचे स्कोअरकार्ड तपासू शकतात.
निकालापूर्वी रोल नंबर तयार ठेवा
महाराष्ट्र बोर्ड इयत्ता 12वीचा निकाल 2024 पाहण्यासाठी आणि डाउनलोड करण्यासाठी, विद्यार्थ्यांना रोल नंबर आवश्यक असेल. त्याशिवाय ते निकाल तपासू शकणार नाहीत.
7,000 विद्यार्थ्यांना 90% गुण मिळाले आहेत
उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (HSC) परीक्षा 2024 चा निकाल आज, 21 मे रोजी महाराष्ट्र राज्य मंडळाकडून जाहीर होणार आहे. गेल्या वर्षी, महाराष्ट्रातील बारावीत ७,००० हून अधिक विद्यार्थ्यांनी ९०% गुण मिळवले होते. गेल्या वर्षी महाराष्ट्र बोर्डाचा बारावीचा निकाल मुलांपेक्षा मुलींचा जास्त लागला होता. एकूण ८९.१४ टक्के मुले बारावी उत्तीर्ण झाली आहेत. तर मुलींचा निकाल ९३.७३ टक्के लागला आहे.