वाशीम : तालुक्यातील बाभूळगाव येथील अनिकेत सादुडे या १४ वर्षीय मुलाचे १२ मार्च रोजी रात्री अपहरण करण्यात आले. या घटनेला तीन दिवस उलटूनही अद्याप मुलाचा शोध लागला नाही. त्यामुळे सारे कुटुंबीय चिंतेत असून, मुलाचा लवकर शोध लावावा, अशी मागणी पोलिस प्रशासनाकडे केली. अपहरण झालेल्या मुलाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी तब्बल नऊ पथके गठित केली असून, गावातही सर्वांची कसून चौकशी केली जात आहे.
साधारण एक वर्षांपूर्वी अनिकेत सादुडे या मुलाच्या वडिलांनी शेती विकली होती. त्यातून त्यांना दीड कोटी रुपये मिळाले होते. कदाचित या पैशांसाठी मुलाचे अपहरण झाले असावे, असा संशय व्यक्त केला जात आहे. दरम्यान, अपहरण झालेला अनिकेत गावामध्येच असलेल्या नानमुखाच्या कार्यक्रमासाठी गेला होता. मात्र, कार्यक्रम संपूनही रात्री उशिरापर्यंत तो घरी न आल्याने त्याच्या वडिलांनी सगळीकडे शोध घेतला. मात्र, तो सापडला आला नाही.
त्याचे वडील जेव्हा घरी परत आले, त्यावेळेस त्यांच्या दारासमोर त्यांना एक बंद लिफाफा मिळाला. त्यामध्ये मुलाचे अपहरण झाले असून, त्याला सोडण्यासाठी ६० लाख रुपये द्या, असा मजकूर लिहिलेला होता. या प्रकाराने सारे कुटुंब हादरून गेले आहे.
शेतकरी कुटुंबावर दु:खाचा डोंगर; १४ वर्षीय मुलाचे अपहरण, ६० लाखांच्या खंडणीची मागणी
by team
Published On: March 16, 2025 5:13 pm

---Advertisement---