---Advertisement---

वीज कोसळून १५ मेंढ्या ठार; पारोळा तालुक्यातील घटना, मदत मिळवून देण्याचे पालकमंत्र्यांचे आश्वासन

---Advertisement---

पारोळा : बहादरपूर शिरसोदे येथे रविवार, २३ रोजी रात्री १०.३० वाजेच्या सुमारास वीज कोसळून १५ मेंढ्यासह एक शेळी ठार झाली. तर मेंढपाळला देखील विजेच्या धक्का बसल्यामुळे दुखापत झाली. या नैसर्गिक संकटाने मेंढपाळावर संकट कोसळले असून, मोठे आर्थिक नुकसान झाले आहे.

जळगाव जिल्ह्यात रविवार, २३ रोजी रात्री विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. पारोळा तालुक्यातील बहादरपूर शिरसोदे येथे मखनापूर पाझर तलाव परिसरात विज पडली. यामुळे १५ मेंढ्या व एक बकरी दगावली, तर मेंढपाळला विजेच्या धक्का बसल्यामुळे दुखापत झाली. मेंढ्यांच्या सांभाळ करून उदरनिर्वाह करणाऱ्या दामू भिल या मेंढपाळावर नैसर्गिक संकट कोसळले आहे. पोलीस पाटील बंडू पाटील, कोतवाल भरत पवार, तलाठी प्रवीण शिंदे आप्पा यांनी पंचनामा केला. ग्रामसेवक योगिता पाटील, शिरसोदे सरपंच बापू सैंदाणे,  ग्रामपंचायत सदस्य, माजी उपसभापती चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते.

नुकसान भरपाईचे आश्वासन
मंत्री अनिल भाईदास पाटील यांना दूरध्वनीद्वारे माहिती देऊन नुकसानग्रस्त मेंढपाळासाठी नुकसानीची मागणी केले. संबंधित नुकसानग्रस्त मेंढपाळच्या संदर्भात पालकमंत्री यांनी जिल्हाधिकारी यांच्याशी फोनद्वारे संपर्क साधत पाठपुरावा करून मदत मिळवून देण्याचे आश्वासन दिले.

 

Join WhatsApp

Join Now

Leave a Comment

---Advertisement---