पाकमध्ये तोडण्यात आले 150 वर्षे जुने मंदिर

कराची,  पाकिस्तान मध्ये नेहमीच हिंदु देवदेवतांची मंदिर तोडण्यात येतात पाकिस्थानात हिंदु लोकांना नेहमीच त्रास दिल्याचं समोर आले आहे. कराचीतील सोल्जर बझारमधील 150 वर्षे जुने पवित्र मारी माता मंदिर तोडण्यात आले असून. हे पाहण्यासाठी कराचीमधील हिंदू समुदाय तेथे जमलं होता. एका शॉपिंग प्लाझासाठी हा प्रकार करण्यात आल्याची चर्चा आहे. शुक्रवारी रात्री उशिरा या परिसरात वीज नसताना हे काम करण्यात आल्याचे स्थानिकांचे म्हणणे आहे. मंदिराच्या बाहेरील भिंतींना कुठलीही इजा झालेली नाही, तर मंदिराची आतील भिंत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याचे लोकांनी सांगितले. पोलिसांनी मंदिर पाडण्यास मदत केल्याचे वृत्तात पाकिस्तानी हिंदूंच्या हवाल्याने म्हटले आहे

 मारी माता मंदिर मुखी चोहितराम रोडवर आहे, जे सोल्जर बाजार पोलिस स्टेशनच्या अगदी जवळ आहे. पाडलेल्या मंदिराजवळील श्री पंचमुखी हनुमान मंदिराचे पुजारी श्रीराम नाथ मिश्रा यांनी सांगितले की,

 ते खूप जुने मंदिर आहे. ते म्हणाले की, हे मंदिर दीडशे वर्षांपूर्वी बांधले गेले.  तेथे पुरलेल्या प्राचीन खजिन्याच्या कथाही आपण ऐकल्या आहेत.  मंदिर सुमारे 400 ते 500 स्क्वेअर यार्डमध्ये पसरले आहे. हे मंदिर कराचीच्या मदारसी हिंदू समुदायाच्या व्यवस्थापनाखाली होते. ही एक अतिशय जुनी आणि धोकादायक रचना असून जी कोणत्याही दिवशी कोसळू शकते असे सांगण्यात आले आहे. पाकिस्तान-हिंदू परिषद, मुख्यमंत्री सय्यद मुराद अली शाह आणि सिंध पोलिसांचे महानिरीक्षक यांनी याची दखल घ्यावी आणि या घटनेची त्वरित चौकशी करावी, अशी विनंती समुदायाने केली आहे,