दीडशे किलो पेक्षा जास्त वजन असलेली आई १० वर्षांच्या मुलाच्या अंगावर बसल्यानं मुलाचा गुदमरून मृत्यू झाल्याची घटना समोर आलीय. पोलिस या प्रकरणाची चौकशी करत आहेत आणि आरोपी महिलेला अटक करण्यात आली आहे. ती महिला बाळाची पालक आई असल्याचे सांगण्यात येत आहे. महिलेने बाळावर बसल्याचे कबूल केले आहे. अमेरिकेतील ही घटना असून महिलेचं नाव जेनिफर असं आहे.
मीडिया रिपोर्ट्सनुसार, १० वर्षांच्या मुलाची ओळख डकोटा लेव्ही स्टीव्हन्स म्हणून झाली आहे. तो इंडियानाचा रहिवासी होता.तर जेनिफर ली विल्सन (वय ४८) अस मुलाच्या सावत्र आईच नाव आहे. जेनिफरचं वजन १५४ किलो इतकं आहे. डकोटा त्याला त्रास होतोय असं नाटक करत आहे असं समजून जेनिफर त्याच्या अंगावर बसली.
जेनिफरने पोलिसांना सांगितलं की,डकोटा हा घरातून बाहेर पळून गेला होता आणि तो शेजाऱ्यांकडे थांबला होता. त्याला शेजाऱ्यांकडे जाण्यापासून रोखण्यासाठी त्याच्या अंगावर बसले होते. जवळपास ५ मिनिटं मी बसूव होते. मला वाटलं की तो त्रास होतोय असं नाटक करतो. पण जेव्हा मुलाने उत्तर दिलं नाही तेव्हा तिच्या लक्षात आलं. शेवटी सीपीआर देण्याचा प्रयत्न केला. काहीच हालचाल होत नसल्यानं पोलिसांना कळवलं.
डकोटाच्या मृत्यू प्रकरणी जेनिफर ली विल्सनला ६ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा सुनावण्यात आलीय. डकोटा स्टीव्हन जेनिफरच्या घरी बेशुद्धावस्थेत आढळून आला होता. त्याच्या मानेवर आणि छातीवर मारहाण केल्यासारख्या खुणा आढळल्या होत्या. त्याला उपचारासाठी रुग्णालयातही नेलं होतं. पण उपचाराआधीच त्याचा मृत्यू झाला होता. शवविच्छेदन अहवालात डकोटा स्टिव्हनच्या मृत्यूचं कारण मेकॅनिकल एस्फिक्सिया असल्याचं सांगण्यात आलंय. त्याच्या फुफ्फुसाला आणि लिव्हरला दुखापत झाली होती.