16 महिन्यांमध्ये तब्बल 5 वेळा हार्ट ॲटॅक अन् सहा वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी तरी…. ती जिवंत

असं म्हणतात देव तारी,त्याला कोण मारी असं म्हटलं जात दैव जर बलवत्तर असेल तर कोणत्यापन कठीण प्रसंगातून माणूस हा बचावतो. मुलुंडमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे, मुलुंडमध्ये राहणाऱ्या एका 51 वर्षांच्या महिलेला गेल्या 16 महिन्यांमध्ये तब्बल 5 वेळा हार्ट ॲटॅक आला आहे. तर या महिलेवरती आत्तापर्यंत सहा वेळा त्यांच्यावर अँजिओप्लास्टी करण्यात आली असून एक बायपास सर्जरीही झाली आहे.तसेच या महिलेची एक बायपास सर्जरीही झाली आहे. 1 आणि 2 डिसेंबरदरम्यान त्यांना शेवटचा हार्ट ॲटॅक आला.

16 महिन्यांपूर्वी आला पहिला हार्ट ॲटॅक 

जयपूरहून बोरिवलीला येत असताना सप्टेंबर 2022मध्ये सुनीता यांना ट्रेनमध्ये पहिल्यांदा हार्ट ॲटॅक आला. रेल्वे अधिकाऱ्यांनी त्याना अहमदाबादच्या सार्वजनिक रुग्णालयात दाखल केले. या वर्षी जुलै महिन्याापसून हृदयरोग विशेषज्ञ डॉ. हसमुख रावत यांच्याकडे सुनिता या उपचारांसाठी जात आहेत. तोपर्यंत त्यांच्या दोन अँजिओप्लास्टी आणि बायपास सर्जरी झालेली होती. त्यांच्या हृदयाशी संबंधित समस्या कशामुळे उद्भवतात हे तर एक रहस्यच आहे. व्हॅस्क्युलिटीस सारखा एक ऑटो-इम्युन आजार, हा यासाठी कारणीभूत ठरू शकतो, असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केले. या ऑटो-इम्युन आजारामध्ये रक्तवाहिन्या सूजतात आणि अरुंद होतात. पण सुनीता यांच्याबाबतीत नेमकं काय घडलंय, हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही.

दर महिन्याला परत जाणवू लागतात

छातीत तीव्र वेदना, ढेकर येणे आणि बेचैन वाटणे यासारखी अनेक लक्षणे त्यांना दर काही महिन्यांनी जाणवू लागतात. सुनीत यांना फेब्रुवारी, मे, जुलै आणि डिसेंबरमध्ये हार्ट ॲटॅक आला. त्या आधीपासूनच मधुमेह, हाय कोलेस्ट्रॉल आणि जाडेपणा यांसारख्या समस्यांचा सामना करत होत्याच. सप्टेंबर 2022 मध्ये त्यांचं वजन 107 किलो होतं. पण तेव्हापासू आत्तापर्यंत त्यांचं वजन 30 किलोंहून अधिक कमी झालं. त्यांना ‘पीसीएसके9 इनहिबिटर’ हे कोलेस्ट्रॉल कमी करणारं इंजेक्शन देण्यात आल्याने त्यांची कोलेस्ट्रॉल लेव्हल कमी झाली आणि मधुमेह देखील नियंत्रणात आहे. पण त्यांना अजूनही हार्ट ॲटॅक येतोच. पेशंट्समध्ये एकाच जागी वारंवार ब्लॉकेज होणं हे काही नवं नाही, पण सुनीता यांच्या केसमध्ये वारंवार, नव्या जागी ब्लॉकेजेस येत आहेत, असं डॉक्टरांनी सांगितलं.