---Advertisement---
जळगाव : जिल्हा परिषदेच्या 161 लेटलतिफ कर्मचाऱ्यांना जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गुरूवारी दणका दिला. कामावर जि.प.त उशिराने दाखल होणाऱ्या लेटलतिफ कर्मचाऱ्यांचे 7 रोजी सकाळी 10 वाजून 5 मिनिटांनी सीईओंनी सर्व विभागांकडून हजेरीपत्रक मागविले. त्यात कर्मचारी विलंबाने येत असल्याचे निदर्शनास आले. त्याअनुषंगाने उशिराने दाखल होणाऱ्या कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत.
https://youtu.be/b3tRI041zq8
जि.प.च्या बांधकाम विभागातील सर्वाधिक 234 कर्मचाऱ्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहेत. जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभाग 13, ग्रामिण पाणीपुरवठा विभाग 12, सामान्य प्रशासन 19, सिंचन विभाग 9, समाज कल्याण विभाग 7, महिला व बालकल्याण विभाग 8, पशुसंवर्धन विभाग 5, आरोग्य विभाग 19, अर्थ विभाग 6, कृषी 5, यांत्रिकी 2, प्राथमिक शिक्षण विभाग 14, माध्यमिक शिक्षण विभाग 7, समग्र शिक्षा 4, पाणी व स्वच्छता विभाग 8 अशा एकूण 161 कर्मचारी ड्युटीवर उशिरा आल्याने त्या सगळ्यांना नोटीसा बजावण्यात येणार आहे. यात कार्यालयीन अधिक्षकासह कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. जि.प.सीईओंनी अचानक कारवाईचा बडगा उगारल्याने कर्मचाऱ्यांना शिस्त लागण्यास मदत होणार आहे.