1993 च्या साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी अब्दुल करीम टुंडा याची सुटका ; 31 वर्षांनंतर न्यायालयाचा निकाल

मुंबई : 1993 ला मुंबईसह देशयातील अनेक राज्यात बोम्बस्फोट झाले होते या साखळी बॉम्बस्फोटातील आरोपी अब्दुल करीम टुंडा याची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केली आहे. राजस्थानमधील अजमेरच्या टाडा कोर्टाने हा निर्णय दिला आहे.

टाडा न्यायालयाने आरोपी अब्दुल करीम टुंडा याची पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. टुंडाच्या विरोधात कोणतेही थेट पुरावे मिळालेले नाहीत, असे न्यायालयाने निर्णयात म्हटले आहे. 6 डिसेंबर 1993 रोजी बाबरी मशीद पाडल्याच्या पहिल्या वर्धापन दिनानिमित्त देशभरातील अनेक गाड्यांमध्ये बॉम्बस्फोट झाले.

1993 मध्ये मुंबई, कानपूर, हैदराबाद, सुरत आणि लखनऊच्या काही ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाले होते. या प्रकरणी अब्दुल करिब टुंडा, इरफान आणि हमीमुद्दीन यांच्यावर गंभीर आरोप करण्यात आले होते. अब्दुल करीम टुंडा याला 2013 मध्ये नेपाळ सीमेवरून पकडण्यात आले होते.