..तर 2050 पर्यंत भारतात राहणे होणार कठीण , तापमान वाढ रोखण्यासाठी काय करावं?

दिवसेंदिवस देशात तापमानाचा पारा वाढत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. बहुतांश ठिकाणी तापमानाच्या पारा ४० अंशाच्या पुढे गेलाय. दरम्यान, देशाची राजधानी दिल्लीनं तापमानाचे आत्तापर्यंतचे सर्व मोडले आहेत. दिल्लीत तापमानाचा पारा हा  अंशाच्या पुढे गेलाय. दिल्लीत आज ५२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. दिल्लीनं तापमानाचा गेल्या १०० वर्षाचा विक्रम मोडला आहे. दिल्लीतील मुंगेशपूरमध्ये ५२.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. दरम्यान, उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर २०५० पर्यंत भारतात राहणे कठीण होईल असा दावा सायन्स डायरेक्ट मॅगझिनमध्ये केलाय.

तापमानाच मोठी वाढ होताना दिसत आहे. असेच तापमान वाढत राहिले तर २०५० पर्यंत भारतात राहणे कठीण होईल असा दावा सायन्स डायरेक्ट मॅगझिनमध्ये करण्यात आलाय. उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर २०५० पर्यंत भारतीय भूमीवर राहणे कठीण होईल. जूनपूर्वीच वाढत्या तापमानाने देशाच्या अनेक भागात हाहाकार माजवला आहे. परिस्थिती अशी आहे की, देशातील बहुतांश भागात तापमानाने ४५ अंश सेल्सिअसचा टप्पा ओलांडला आहे.

तापमान वाढण्यामागे हवामानातील बदल हेच कारण
दिल्लीत तापमानाचा पारा ५२ अंशावर गेल्या. तर चुरूमध्ये ५०.५ अंश सेल्सिअस आणि सिरसामध्ये ५०.३ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झालीय. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, २०२४ च्या सुरुवातीपासून तापमानात वाढ दिसून येत आहे. फेब्रुवारी ते मे या कालावधीत प्रत्येक महिन्याचे तापमान सरासरीपेक्षा जास्त होते. तापमान वाढण्यामागे हवामानातील बदल असल्याचे विभागाचे म्हणणे आहे. वेस्टर्न डिस्टर्बन्सअभावी देशात उष्णता वाढल्याचे हवामान विभागाचे म्हणणे आहे.

उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना करायला हव्यात
वातावरणातील उष्णता रोखण्यासाठी शास्त्रज्ञ अनेक प्रकारचे संशोधन करत आहेत. तंत्रज्ञान ज्याद्वारे शास्त्रज्ञ तापमान कमी करण्याची आशा करतात. जास्तीत जास्त झाडे लावून आणि तेल आणि वायूचा वापर कमी करूनच उष्णता कमी होऊ शकते असं बहुतांश शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे. भारताची परिस्थिती पाहिली तर एकीकडे तेल आणि वायूचा वापर वाढत आहे तर दुसरीकडे झाडे तोडण्याचे प्रकारही मोठ्या प्रमाणात होत आहेत. सायन्स डायरेक्ट मासिकानुसार, उष्णता थांबवण्यासाठी ठोस उपाययोजना केल्या नाहीत, तर २०५० पर्यंत भारतीय भूमीवर राहणे कठीण होईल. मासिकानुसार २०५० मध्ये सरासरी तापमान ३ अंश सेल्सिअसने वाढू शकते.

तापमान कमी करण्यासाठी ‘या’ उपायोजना करा
झाडांची कत्तल थांबवावी
सध्या भारतात बांधकामाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणात वृक्षतोड सुरु आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, गेल्या ५ वर्षांत विकास आणि बांधकामाच्या नावाखाली १ कोटीहून अधिक झाडे तोडण्यात आली आहेत. केंद्राने संसदेत दिलेल्या निवेदनानुसार २०१६-१९ या वर्षात देशात ७६ लाख ७६ हजार झाडे सरकारने कापली. २०२०-२१ मध्येही विकासाच्या नावाखाली ३० लाख झाडे तोडण्यात आली आहेत. मात्र, सरकारने झाडे तोडण्याऐवजी झाडे लावल्याचा दावा केला आहे. सरकारी आकडे सोडले तर गेल्या २० वर्षांत देशात २३ लाख हेक्टर जंगल नष्ट झाले आहे. ग्लोबल फॉरेस्ट वॉचने २०२३ मध्ये ही आकडेवारी जाहीर केली होती.

अहवालात दिलेल्या माहितीनुसार, २००२ ते २०२३ या काळात भारतात सर्वाधिक जंगलतोड आसाम, मिझोराम, अरुणाचल, नागालँड आणि मणिपूरमध्ये झाली आहे. अन्न आणि कृषी संघटनेच्या मते, २०१५-२० दरम्यान भारतातील जंगलतोड दर वर्षी ६६८,००० हेक्टर होती, जी जगातील दुसऱ्या क्रमांकाची सर्वोच्च आहे.

बांधकामातही मोठ्या प्रमाणात वाढ
बांधकाम क्षेत्रातही भारत मागे नाही. गेल्या दशकात त्यात कमालीची वाढ झाली आहे. सरकारी आकडेवारीनुसार, २०१४-२३ पासून राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात ६० टक्क्यांची वाढ झालीय. रस्ते मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, २०१४ मध्ये ९१ हजार किमी राष्ट्रीय महामार्ग बांधण्यात आले होते. जे आता १ लाख ४१ हजार किमी पार केले आहे. या काळात ४ लेनचे बांधकामही २ टक्क्यांनी वाढले आहे. कनेक्टिव्हिटीच्या नावाखाली ग्रामीण भागातील रस्त्यांच्या बांधकामातही मोठी वाढ झाली आहे. केंद्राच्या मते, २०१४ मध्ये दररोज ११.०६ किमी ग्रामीण रस्ते बांधले जात होते, जे २०२३ मध्ये २८ किमी प्रतिदिन होईल.

रस्त्यांबरोबरच इमारतींचे बांधकामही झपाट्याने वाढले आहे. ग्लोबल कन्स्ट्रक्शन पर्स्पेक्टिव्ह आणि ऑक्सफर्ड इकॉनॉमिक्सनुसार, २०२५ मध्ये भारतात १.१ कोटी घरे बांधली जातील. अन्य एका खासगी एजन्सीच्या मते, बांधकाम क्षेत्रात खूप वाढ झाली आहे आणि २०३० पर्यंत या क्षेत्रात १ अब्ज कामगार असतील.

मोठ्या प्रमाणात वाहनांच्या खरेदीमुळं तापमानात वाढ
कार आणि इतर वाहने देखील तापमान वाढवण्यात मोठा हातभार लावतात. युनिव्हर्सिटी कोऑपरेशन फॉर ॲटमॉस्फेरिक रिसर्चनुसार, पेट्रोलवर चालणाऱ्या कार कार्बन डायऑक्साइड आणि इतर हरितगृह वायू सोडतात. ज्यामुळं तापमान वाढते. गेल्या दशकात भारतातील ऑटोमोबाईल विक्रीत लक्षणीय वाढ झाली आहे. सोसायटी ऑफ इंडियन ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरर्स च्या मते, २०२०-२१ मध्ये भारतात १ कोटी ८६ लाख मोटारगाड्या विकल्या गेल्या. २०२३-२४ मध्ये ही संख्या वाढून २ कोटी ३६ लाख झाली आहे. जर आपण २०११ बद्दल बोललो तर या वर्षी भारतात १.५ कोटी वाहनांची विक्री झाली आहे. गेल्या ३ वर्षात प्रवासी वाहनांच्या विक्रीत दुपटीने वाढ झाली आहे, तर तीन चाकी वाहनांच्या विक्रीत या काळात ३ पट वाढ झाली आहे.

एअर कंडिशनरचा वापर वाढला
भारतामध्ये उष्णतेपासून वाचण्यासाठी एअर कंडिशनरचा वापर हा ट्रेंड बनला आहे, त्यामुळे त्याची विक्री आणि वापर लक्षणीय वाढला आहे. एका अहवालानुसार २०१० च्या तुलनेत २०२३ मध्ये भारतात एअर कंडिशनरच्या विक्रीत ३ पटीने वाढ झाली आहे. सध्या भारतात प्रत्येक १०० पैकी २४ घरांमध्ये एअर कंडिशनर वापरले जातात. याच अहवालात २०५० पर्यंत भारतातील प्रत्येक १०० पैकी ७२ घरांमध्ये एसी असेल, अशी भीती व्यक्त करण्यात आली आहे. मुंबई आणि दिल्लीसारख्या महानगरांमध्ये एसीची विक्री सर्वाधिक आहे.आयईए-५०  नुसार, भारतात एसीची मागणी १५ टक्क्यांनी वाढली आहे. शास्त्रज्ञांच्या मते, एसी आपल्या सभोवतालचे तापमान २ अंशांपर्यंत वाढवते. शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे की एसीमुळे तापमान वाढण्याचे मुख्य कारण म्हणजे त्याचा वापर करण्याची वेळ. लोक साधारणपणे रात्री आणि पहाटे सर्वात जास्त एसी वापरतात. सकाळचे वातावरण शांत असते आणि एसीमधून निघणारी उष्णता तापमानात मिसळते. त्यामुळं तापमानात वाढ होते.