जे.पी. नड्डा यांचा उद्धव ठाकरेंना टोला, म्हणाले…

नवी दिल्ली : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी ओडिशातील भवानीपटना येथे भाजपच्या महाजनसंपर्क अभियानात लोकांना  संबोधित करताना विरोधी पक्षावर जोरदार टीका केली आहे.

काय म्हणाले नड्डा?
नड्डा म्हणाले की, हिंदूंची न्याय-ह्क्कांची गोष्ट करणारे उद्धव ठाकरे विरोध पक्षांसह पाटनामध्ये दाखल झालेत. त्यामुळे हिंदूहद्य सम्राट बाळासाहेब ठाकरे म्हणाले होते की, जर काँग्रेससोबत हातमिळवणी करायला लागली तर मी माझे दुकान कायमचे बंद करेन. पण आता उद्धव ठाकरेंच्या विरोधी पक्षांशी केलेल्या हातमिळवणी मुळे कोणी दुसऱ्यांने नाही तर उद्धव ठाकरेंनीच दुकान बंद करून टाकला आहे.

तसेच विरोधी पक्षाने किती ही टीका केली तरी पूर्ण भारताची जनता मोदीजींच्या पाठीशी आहे हे विरोधकांनी विसरू नये, असे ही नड्डा म्हणाले. त्याचबरोबर ओडिशात सरकार नवीन पटनायक चालवत नसून दुसरं कोणीतरी चालवयं. त्यामुळे विरोधी पक्ष सोडा, सत्ताधारी पक्षांच्या लोकप्रतिनिधींचे कोणी ऐकत नाही. म्हणून या सगळ्याचा परिणाम म्हणून ओडिशात पुढचे सरकार भाजपचेच असेल, मात्र त्यासाठी कठोर परिश्रम करावे लागतील, असे ही जे.पी .नड्डा म्हणाले. यावेळी केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, भाजपचे राष्ट्रीय मंत्री उपस्थिती दर्शवली .