जळगाव : वनपरिक्षेत्र पाचोरा अंतर्गत परिमंडळ भडगाव, नियतक्षेत्र पळासखेडामधील आमडदे गावाजवळील वनक्षेत्राच्या हद्दीत दोन वेगवेगळ्या घटनांमध्ये अवैध। शिकारीच्या उद्देशाने वनक्षेत्रात फिरणारे एकूण २४ आरोपी व दोन पीकअप व्हॅन ताब्यात घेण्यात आल्या.
पहिल्या घटनेत गुप्त माहितीच्या आधारे वनरक्षक दुर्गादास वानखेडे व वनरक्षक मुकेश बोरसे यांना वनविभागाच्या कक्ष क्रमांक ३६६ मध्ये एक पीकअप व्हॅन (एमएच-१८- बीजी- ४८९१) संदिग्ध अवस्थेत आढळून आली, या व्हॅनची तपासणी केली असता व्हॅनमध्ये दोन आरोपी, एक मृत रानडुक्कर व भाला, जाळी या प्रकारचे शिकाराचे साहित्य आढळले. या आरोपींना विचारपूस केली असता, त्यांनी त्यांचे इतर सहकारी जंगलात शिकारीसाठी गेले असलेबाबत सांगितले. त्यानंतर वनपरिक्षेत्र पाचोरा अंतर्गत सर्व कर्मचारी /अधिकारी यांनी जंगल पिंजून काढले परंतु इतर आरोपी आढळले नाहीत. त्यानंतर परतीच्या वाटेवर असताना एक बोलेरो पीकअप व्हॅन
(एमएच-१३- आर-८१२५) तळबंद तांडा ते आमडदे या रस्त्यावर संदिग्ध अवस्थेत आढळली. या गाडीची तपासणी केली असता, तीत २२ आरोपी आढळले. त्यांच्याजवळ शिकारीसाठी लागणारी जाळी, भाला, कुन्हाड हे साहित्य आढळले. या ये आरोपींना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याविरुद्ध वनगुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास उपवनसंरक्षक व्ही. व्ही. होशींग यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक वनसंरक्षक (रोहयो व वन्यजीव) एस. के. शिसव यांच्यामार्फत करण्यात येत आहे. ही कारवाई वनपरिक्षेत्र अधिकारी ए. एस. मुलाणी, वनपाल पी. बी देवरे, एन. पी. पाटील, वनरक्षक दुर्गादास वानखेडे, के. डी. पाटील, मुकेश बोरसे, पी. व्ही. सूर्यवंशी, ए. एस. भोई व इतर वनकर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.