तरुण भारत लाईव्ह न्युज । १४ डिसेंबर २०२२ । सणासुदीत गणेशोत्सव आणि दिवाळीत जिल्ह्यात विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी टाकून 27 अन्न आस्थापनाची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच 55 अन्न नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. त्याचा अहवाल दोन दिवसात प्राप्त होईल, अशी माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहाय्यक आयुक्त (अन्न) संदीप पंतगे यांनी दिली. सणासुदीच्या काळात जिल्ह्यात विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी टाकून 27 अन्न अस्थापनाची तपासणी करण्यात आलेली आहे. तसेच 55 अन्न नमुने ताब्यात घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आलेले आहे. साडेचार लाखाची नमकीन मिठाई जप्त करण्यात आली आहे.
गेल्या आठ ते दहा महिन्याच्या कालावधित गणेशोत्सव, नवरात्रोत्सव आणि दिवाळीच्या सणासुदीच्या काळात तेल, खवा, फरसाण व नमकीन, मिठाई, चना बेसन, तूप, वनस्पती, पॅकेजिंग मटेरिअल आदी साहित्याची चाळीसगाव, मुक्ताईनगर, भुसावळ आणि जळगाव शहरातील विविध ठिकाणी अन्न व औषध प्रशासनाच्या पथकाने धाडी टाकून 27 अन्न आस्थापनाची तपासणी करण्यात आलेली आहे. सणासुदीच्या काळात मिठाईच्या दुकानात मिठाईवर खाण्यास योग्य तारीख न लिहिल्यामुळे 8 आस्थापनाची तपासणी करण्यात आली आहे. यात रोहिणी स्वीट आणि फरसाण महाबळ जळगाव, अंबिका स्वीट्स आणि बेकर्स, चाळीसगाव, गिरनार स्वीट्स चाळीसगाव, न्यू गुजराथी स्वीट्स अॅण्ड फरसाण, भुसावळ, श्री राजस्थानी स्वीट्स स्मार्ट, भुसावळ, कामधेनू जलपान गृह भुसावळ, मदिना स्वीट्स अॅण्ड बेकरी, भुसावळ, नाकोडा जैन बिकानेर उपहार गृह मुक्ताईनगर आदी दुकानातील तपासणी करीत मिठाईचे नमुने ताब्यात घेऊन प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. तसेच जैन हेलदी फुडस आटोनगर जळगाव, मधुरम स्वीट्स रिंगरोड जळगाव, अंबिका स्वीट्स आणि बेकर्स चाळीसगाव या दुकानाचे अन्न परवाना नसल्यामुळे व अन्न सुरक्षा व मानके कायद्यातील तरतुदींचे उल्लंघन केल्यामुळे अन्न व्यवसाय थांबविण्याची नोटीस देण्यात आलेली आहे.
तेल 13 अन्न नमुने घेतले असून 2429.6 किलोगॅ्रम साठा जप्त केला आहे. खवाचे 5 नमुने घेतले असून 33 किलोगॅ्रम,फरसाण व नमकीनचे 12 नमुने घेतले असून 209 किलोगॅ्रम, मिठाईचे 10 नमुने घेतले असून 410.5 किलोगॅ्रम, चना बेसनचे 1 नमुना 418 कि.गॅ्र.. साठा जप्त केला आहे.तूपचे 13 नमुने घेतले आहे. वनस्पतीचा 1 नमुना घेतलेला आहे. असा एकूण 4 लाख 94 हजार 362 रुपयांचा माल जप्त करण्यात आलेला आहे.
नऊ आस्थापनांवर कारवाई….
शहरातील बाबा स्वीट्स आणि नमकीन एमआयडीसी जळगाव, अंबिका स्वीट्स आणि बेकर्स चाळीसगाव, नानक ट्रेडर्स पाचोरा, जैन हेलदी फूडस् आटोनगर जळगाव, गोविंद कोलते फूडस एमआयडीसी जळगाव, जय हिंद ट्रेडिंग कंपनी पोलन पेठ जळगाव, श्री दत्त डेअरी जुनी नवीपेठ जळगाव, मा तारा फूड प्रोडक्टस् एमआयडीसी जळगाव, खुशी स्वीट्स एमआयडीसी जळगाव आदी 9 ठिकाणी धाडी टाकून अन्न नमुने ताब्यात घेतले आहे. जळगाव शहरातील बाबा स्वीट्स आणि नमकीन एमआयडीसी जळगाव, अंबिका स्वीट्स आणि बेकर्स चाळीसगाव, नानक ट्रेडर्स पाचोरा, जैन हेलदी फूडस् आटोनगर जळगाव, गोविंद कोलते फुडस एमआयडीसी जळगाव, जय हिंद ट्रेडिंग कंपनी पोलन पेठ जळगाव, श्री दत्त डेअरी जुनी नवीपेठ जळगाव, खुशी स्वीट्स एमआयडीसी जळगाव आदी 9 ठिकाणी धाडी टाकून अन्न नमुने ताब्यात घेतले आहे.