तरुण भारत लाईव्ह न्यूज । १४ डिसेंबर २०२२ । जळगाव जिल्हा परिषदेत मंगळवारी विविध विभागातील परिचर, कनिष्ठ सहाय्यक, वरिष्ठ सहाय्यक, कनिष्ठ प्रशासन अधिकारी व सहाय्यक प्रशासन अधिकारी अशा पदांवर 28 कर्मचार्यांना पदोन्नत्या देण्यात आल्या आहे. तसे आदेश सीईओ डॉ.पंकज आशिया यांनी दिले. त्यामुळे कर्मचार्यांना वर्षा अखेरीला पदोन्नत्यांची लॉटरी लागली आहे.
गेल्या महिन्यातच काही कर्मचार्यांना पदोन्नत्या देवून हा प्रश्न निकाली काढला होता. मात्र आता उर्वरीत पात्र कर्मचार्यांना देखील पदोन्नत्या देण्यात आल्या आहे. त्यात 12 सफाई कर्मचारी व परिचर यांना कनिष्ठ सहाय्यक पदावर पदोन्नती मिळाली आहे. या पदावरील कर्मचारी काही वर्षांपासून त्यात पदावर कार्यरत होते.
14 कनिष्ठ सहाय्यकांना वरिष्ठ सहाय्यक पदावर बढती देण्यात आली आहे. 1 वरिष्ठ सहाय्यकास कनिंष्ठ प्रशासन अधिकारी तर एक कनिष्ठ प्रशासन अधिकार्याला सहाय्यक प्रशासन अधिकारी पदावर बढती मिळाली आहे. गेल्या दोन आठवड्यापासून सीईओ डॉ.पंकज आशिया हे रजेवर होते. मंगळवार ते जिल्हा परिषदेत रूजू झाल्यानंतर त्यांनी पदोन्नत्यांचा प्रश्न मार्गी लावला आहे.