3 राज्यांत फुलले ‘कमळ’, जळगावात आनंदोत्सव

जळगाव : आज चार राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल जाहीर होत आहेत. यात मध्यप्रदेश, राजस्थान आणि छत्तीसगड या तीन राज्यांमध्ये भाजपने जवळपास सत्ता हासील केली आहे. तर तेलंगणात काँग्रेसने बहुत मिळवले आहे. दरम्यान, जसे जसे निकाल हाती येत आहे. तस तसे विजयी झालेल्या पक्षांकडून जल्लोष साजरा करण्यात येत आहे. जळगाव शहरात देखील भाजप कार्यकर्त्यांकडून येथील जिल्हा भाजप कार्यालयात मोठ्या उत्साहात आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

या विजयाचा आनंदोत्सव ढोल ताशांच्या गजरात फटाके फोडून व मिठाई वाटून आज जिल्हा भाजपा कार्यालय वसंत स्मृती भाजपा कार्यालयात साजरा करण्यात आला. याप्रसंगी आमदार राजूमामा भोळे यांच्यासह जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महाराज जळकेकर, महानगर जिल्हाध्यक्ष उज्वला बेंडाळे, लोकसभा प्रमुख डॉ. राधेश्याम चौधरी, संघटन सरचिटणीस अरविंद देशमुख, माजी उपमहापौर डॉ .अश्विन सोनवणे, अजय गांधी, महेश जोशी, रोहित निकम, माजी नगरसेविका सुचिता हाडा, दीपमाला काळे, दीप्ती चिरमाडे, रेखा वर्मा, भाग्यश्री चौधरी, आनंद सपकाळे, राहुल पाटील, राजू मराठे, प्रकाश बालानी, यशवंत पाटील, कैलास सोमानी, अमित देशपांडे, शक्ती महाजन, चेतन शर्मा, धीरज वर्मा, राहुल मिस्त्री, अक्षय जेजुरकर, मिलिंद चौधरी, महेश चौधरी, मुकुंद मेटकर, अतुल बारी, अमय राणे, क्षितिज भालेराव, मुकुंदा सोनवणे, केशव नारखेडे, उदय भालेराव, प्रल्हाद सोनवणे, अशोक राठी, प्रकाश पंडित, दिलीप नाझरकर, अनिल जोशी, विजय राजपूत पाटील, राहुल पाटील, दीपक कोळी, ललित बडगुजर, जयंत चव्हाण, अरुण श्रीखंडे, प्रसिध्दी प्रमुख मुविकोराज कोल्हे आदी पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.