भुसावळ : केंद्रीय अर्थसंकल्प २०२४-२५ च्या बजेटमध्ये महाराष्ट्राता विक्रमी १५ हजार ५५४ कोटी रुपयांची तरतूद करण्यात आल्याची माहिती रेल्वे, संचार, इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिली. दिल्ली आणि महाराष्ट्रातील (व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे) प्रसार माध्यमांना बुधवारी त्यांनी संबोधित केले. पीजे रेल्वे मार्गासाठी ३५० कोटींची तरतूद करण्यात आल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
राज्याला १३ पट अधिक निधी
महाराष्ट्राला प्रति वर्ष दिल्या जाणाऱ्या सरासरी १.१७१ कोटी रुपयांच्या वाटपाच्या जवळपास १३ पट निधी देण्यात आत्याचे रेल्वे मंत्री म्हणाले. या प्रसंगी मध्य रेत्वेचे महाव्यवस्थापक राम करण यादव, पीएचओडी आणि मुंबई मार्गासाठी ३०० तर धुळे-नरडाणा भुसावळ, नागपूर, पुणे आणि सोलापूरचे इतर विभागीय रेल्वे व्यवस्थापक आणि महाराष्ट्रातील विभागीय रेल्वे व्यवस्थापक त्यांच्या संबंधित मुख्यालयात उपस्थित होते. भुसावळ विभागात विभागीय रेल्वे व्यवस्थापक ईती पाण्डेय, अपर विभागीय रेल्वे व्यवस्थापक सुनील कुमार सुमन आणि इतर संबंधित अधिकारी उपस्थित होते.
भुसावळ विभागासाठी भरीव तरतूद
भुसावळ विभागातील धुळे (बोरविहीर) नरडाणा या ५०.६ किमीमीटर लांबीच्या रेत्वे लाईनसाठी ३५० कोटी रुपये तसेच पाचोरा-जामनेर या ८४ किलोमीटर अंतराच्या लाईनच्या गेज रुपांतरणासाठी ३०० कोटींची तरतूद करण्यात आली. मनमाड-जळगाव तिसऱ्या रेल्वे लाईनीसाठी १२० कोटी रुपये तर जळगाव-भुसावळ चौथ्या लाईनसाठी ४० कोटी रुपयांची तरतूद तसेच भुसावळ- बडनेरा साइड ट्रेनसाठी वेगळी अप आणि डाउन मुख्य लाईन, अप दिशेने अतिरिक्त द्वीप प्लेटफामसाठी ११ कोटी रुपये तसेच निफाड आरओबीसाठी पाच कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.