दुपारी 1 वाजेपर्यत जळगाव लोकसभा मतदार संघात 31.70 तर रावेर मतदार संघात 32.02 टक्के मतदान

जळगाव :  जिल्ह्यातील जळगाव लोकसभा आणि रावेर लोकसभा मतदार संघात सकाळी 7 ते दुपारी 1 पर्यंत जळगाव लोकसभा मतदार संघात 31.70 तर रावेर मतदार संघात 32.02 टक्के मतदान झाले आहे.

मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनातर्फे मोठ्या प्रमाणावर जनजागृती करण्यात आली. परंतु, उन्हाची तीव्रता पाहता दोन्ही मतदार संघात मतदारांमध्ये दुपारी 1 वाजेपर्यंत निरुत्सव पाहावयास मिळाला. जळगाव लोकसभा मतदारसंघात दुपारी 31.70 टक्के मतदान झाले आहे.  यात जळगाव विधानसभा मतदारसंघ 32.22,  जळगाव ग्रामीण विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक  34.93, अमळनेर विधानसभा मतदारसंघ 31.62,  एरंडोल विधानसभा मतदारसंघ –35.05,
चाळीसगाव विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 26.97 तर पाचोरा विधानसभा मतदारसंघ 30.16 टक्के मतदान झाले आहे.

रावेर लोकसभा मतदारसंघात 32.02 टक्के मतदान झाले.  चोपडा विधानसभा मतदारसंघात सर्वाधिक  35.23  तर जामनेर विधानसभा मतदारसंघात सर्वात कमी 29.56 टक्के मतदान झाले आहे. रावेर विधानसभा मतदारसंघ 31.29,
भुसावळ विधानसभा मतदारसंघ –31.84,  मुक्ताईनगर विधानसभा मतदारसंघ 30.60 तसेच मलकापुर विधानसभा मतदारसंघात 33.65 टक्के मतदान झाले आहे.